
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष उत्तर सोलापूर अंतर्गत स्थापित स्वयं सहायता समूहाला उपजीविका बळकटीकरणासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया, शाखा नान्नजच्या वतीने ६२ स्वयं सहायता समूहाला १ कोटी २१ लाख रुपये बँक कर्ज वितरण करण्यात आले.
सोलापूर / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष उत्तर सोलापूर अंतर्गत स्थापित स्वयं सहायता समूहाला उपजीविका बळकटीकरणासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया, शाखा नान्नजच्या वतीने ६२ स्वयं सहायता समूहाला १ कोटी २१ लाख रुपये बँक कर्ज वितरण करण्यात आले.
या बँक कर्ज वितरण मेळाव्याला संतोष धोत्रे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी उमा साळे, सहाय्यक महाप्रबंधक, एसबीआय,राजीव गुप्ता, क्षेत्रिय प्रबंधक, SBI, सोलापूर, प्रशांत देशमुख, गट विकास अधिकारी, उत्तर सोलापूर, निखिल केत, शाखा व्यवस्थापक, SBI, नान्नज मीनाक्षी मडवळी जिल्हा अभियान व्यवस्थापक, भगवान कोरे, राहुल जाधव, सरपंच राणी टोणपे आणि उपसरपंच ज्योती दडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पूनम दुध्याल, तालुका अभियान व्यवस्थापक व आभार प्रदर्शन पोपट चौधरी यांनी केले.
हा कर्ज वितरण मेळावा यशस्वी होण्यासाठी पूनम दुध्याल, प्रमोद चिंचुरे, उषा तोंडसे, विमल गोरे, विजया पाटील, शीतल मोरे, रोहिणी मूळे, वैशाली कुंभार यांनी घेतले. ज्या स्वयं सहायता समूहाला कर्ज वितरण करण्यात येणार होते. त्या समूहातील महिला सदस्य उपस्थित होते.