समृद्धी साखर कारखान्याकडून शेतकऱ्यांच्या मुलीच्या लग्नात 100 किलो साखर फुकट!

समृद्धी साखर कारखान्यानं शेतकऱ्यांच्या मुलीच्या लग्नात 100 किलो साखर फुकट द्यायचा निर्णय घेतल आहे. या निर्णयामुळे शेतऱ्यांमध्ये आंनदाच वातावरण आहे.

    जालना : जालना (Jalna) जिल्ह्यातील ‘समृद्धी’ साखर कारखान्यानं (Samruddhi Sakhar Karkhana) शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची घोषणा केली आहे. शेतकऱ्यांच्या मुलीच्या लग्नात एक क्विंटल साखर फुकट देण्याचा निर्णय घेतला आहे. कारखान्याचे सभासद असलेल्या शेतकऱ्यांना याचा लाभ घेता येणार आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाच वातावरण आहे.

    समृद्धी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानुसार आता शेतकऱ्यांच्या मुलीच्या लग्नासाठी 100 किलो साखर घरपोच पाठवण्यात येणार आहे. सभासद शेतकरी हे आमच्या कारखान्याकडे ऊस गाळपासाठी पाठवत असतात. त्याला कारखान्याबद्दल एक आत्मियता असते. आम्ही सुद्धा शेतकऱ्यांचे काही देणं लागतो, याच भावनेतून कारखान्यानं हा निर्णय घेतल्याची माहिती कारखान्याचे संचालक सतीश घाटगे यांनी दिली आहे.

    [read_also content=”देशात गेल्या 24 तासात 5 हजार 383 रुग्णांची नोंद~https://www.navarashtra.com/india/india-reports-5383-fresh-cases-in-last-24-hours-nrps-328876/”