साईनिर्माणच्या विद्यार्थ्यांना ११ सुवर्ण, २ रौप्य

युथ गेम फेडरेशन ऑफ इंडिया यांच्यावतीने दिल्ली हरियाणा सोनीपत येथील राष्ट्रीय स्पर्धेत शिडीर्तील साईनिर्माण करिअर अ‍ॅकेडमीच्या विद्यार्थ्यांनी दहा राज्यातून ११ सुवर्ण पदके व २ रौप्य पदकांची कमाई करत सर्वाधिक पदके मिळवण्याचा बहुमान मिळवून राष्ट्रीय स्पर्धेत दबदबा निर्माण केला.

    शिर्डी : युथ गेम फेडरेशन ऑफ इंडिया यांच्यावतीने दिल्ली हरियाणा सोनीपत येथील राष्ट्रीय स्पर्धेत शिडीर्तील साईनिर्माण करिअर अ‍ॅकेडमीच्या विद्यार्थ्यांनी दहा राज्यातून ११ सुवर्ण पदके व २ रौप्य पदकांची कमाई करत सर्वाधिक पदके मिळवण्याचा बहुमान मिळवून राष्ट्रीय स्पर्धेत दबदबा निर्माण केला. या बहुमोल कामगिरीबद्दल साईनिर्माणचे संस्थापक अध्यक्ष विजय कोते यांनी अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.

    दिल्ली सोनीपत येथे सुरू असलेल्या युथ गेम फेडरेशन आँफ इंडिया यांच्या वतीने राष्ट्रीय पातळीवर स्पर्धेत एकूण दहा राज्यातील टीम सहभागी होत्या. महाराष्ट्र, जम्मू काश्मीर, मध्यप्रदेश, बिहार, उत्तरप्रदेश, राज्यस्थान, पंजाब, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, केरळ. यापैकी महाराष्ट्रातून तीन टिम सहभागी झाल्या होत्या. शिर्डी येथील साई निर्माण अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी सर्वात जास्त १३ पैकी ११ सुवर्णपदक व २ रौप्यपदके पटकावत या स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले.

    यांना मिळाले पदके

    गोळा फेक स्पर्धेत स्नेहल देवकर हिने (सुवर्ण पदक), ४०० मिटर धावणे स्पर्धेत शुभांगी कापकर (सुवर्ण पदक), १०० मिटर धावणे स्पर्धेत राणी सावंत (सुवर्ण पदक), २०० मिटर धावणे स्पर्धेत वैष्णवी दणके (सुवर्ण पदक), १०० मिटर धावणे स्पर्धेत विजय थोरात (सुवर्ण पदक), १७ वषार्खालील ३ किमी धावणे स्पर्धेत ओम रोकडे (सुवर्ण पदक), २० वर्ष वयोगटाखालील 3 किमी धावणे स्पर्धेत साई मार्कंड (सुवर्ण पदक), ८०० मीटर धावणे स्पर्धेत सागर वाकचौरे (सुवर्ण पदक), १० किमी धावणे स्पर्धेत ऋषिकेश काटे (सुवर्ण पदक), गोळा फेक स्पर्धेत सचिन पवार (सुवर्ण पदक), ५७ किलो वजनी गटात कुस्ती स्पर्धेत शिवम पाचोरे (सुवर्ण पदक), ५ किमी धावणे स्पर्धेत वणेश आरणे (रौप्य पदक), २०० मिटर धावणे शुभम जमधडे (रौप्य पदक).