श्री छत्रपती शाहू कारखान्याच्या निवडणुकीसाठी १११ अर्ज दाखल

श्री शाहू छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी ३ डिसेंबर ते ९ डिसेंबर या काळात गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी एकूण १०२ जणांनी १११ उमेदवारी अर्ज दाखल केले.

    कागल : श्री शाहू छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी ३ डिसेंबर ते ९ डिसेंबर या काळात गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी एकूण १०२ जणांनी १११ उमेदवारी अर्ज दाखल केले. यामध्ये अ वर्ग उत्पादक गटातून ८४ , ब वर्ग गटातून ९, महिला प्रवर्गातून १२, अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातून ६ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.

    यात कारखान्याचे विद्यमान चेअरमन समरजितसिंह घाटगे, विद्यमान संचालिका सुहासिनीदेवी घाटगे, वीरकुमार पाटील, विद्यमान उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे, युवराज अर्जुना पाटील, धनंजय पाटील, यशवंत उर्फ बॉबी माने, सचिन मगदूम, या विद्यमान संचालकांचा समावेश आहे. याशिवाय ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ माजी आमदार संजय घाटगे यांच्या समर्थकांनी ४९ व्यक्तींनी ५४ अर्ज भरले आहेत.

    यामध्ये अ वर्ग उत्पादक गट ४३, ब वर्ग संस्था गटातून ४, महिला प्रवर्गातून ४, अनुसूचित जाती, जमाती ३ गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यामध्ये उत्पादक गटातून सुनील मगदूम सर्जेराव तळेकर, प्रताप पाटील, सतीश पाटील, एकनाथ पाटील, प्रमोद पाटील, संगीता बाबगोंड पाटील, पांडुरंग काळबर, उदय घाटगे, मारुती चौगुले, धनाजी पाटील, रमेश ऐनापुरे, यशवंत माने, धनाजी नागराळे, राजगोंडा पाटील, तसेच अनुसूचित जाती ,जमाती प्रवर्गातून लक्ष्मण कांबळे, भाऊसो कांबळे, महिला प्रवर्गातून सुनिता शेळके, सरस्वती पाटील, विमल चौगुले, रेखाताई पाटील, जिजाबाई पोवार यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.

    उमेदवारी अर्जाची छाननी १३ डिसेंबर रोजी आहे. तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत १४ ते २२ डिसेंबर दरम्यान आहे. आणि १ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अरुण काकडे काम पाहत आहेत.