दूधसंघाच्या प्रारूप मतदारयादीवर ११७ हरकती

सोलापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या प्रारूप मतदार यादीवर ११७ जणांनी हरकती घेतल्या आहेत. हरकती घेण्याच्या शेवटच्या दिवशी ४१ दूध संस्थानी हरकती सहाय्यक निबंधक यांच्याकडे देण्यात आल्या आहेत. त्यामुळे या हरकतीवर आता २९ डिसेंबर रोजी सुनावणी होणार आहे.

  सोलापूर / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : सोलापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या प्रारूप मतदार यादीवर ११७ जणांनी हरकती घेतल्या आहेत. हरकती घेण्याच्या शेवटच्या दिवशी ४१ दूध संस्थानी हरकती सहाय्यक निबंधक यांच्याकडे देण्यात आल्या आहेत. त्यामुळे या हरकतीवर आता २९ डिसेंबर रोजी सुनावणी होणार आहे.

  सोलापूर जिल्हा दूध उत्पादक संघाची २६३ सभासदांची यादी प्रसिध्द करण्यात आली आहे. या प्रारूप मतदार यादीवर हरकत घेण्याची अंतिम मुदत शुक्रवारी होती. हरकत घेण्याच्या शेवटच्या दिवशी ४१ जणांनी हरकती घेतल्या आहेत. या घेण्यात आलेल्या हकरतीमध्ये प्रामुख्याने प्रारूप मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट करा, नाव वगळा व नावात दुरूस्त करा या कारणासाठी या ११७ हरकती घेण्यात आल्या आहेत. तर सर्वाधिक प्रारूप मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट करण्यासाठी १०१ संस्थानी हरकती घेतल्या आहेत.

  निवडणुकीपासून आम्हाला वंचित न ठेवता आम्हाला देखील मतदानाचा अधिकार मिळावा यासाठी हरकती घेण्यात आल्या आहेत. तर २६३ या प्रारूप मतदारयादीमधून नाव कमी करा म्हणून सोनसिध्द ठोमळ, गणेश फताटेवाडी, गंगामाई पानगाव, निलकंठेश्‍वर पांगी, खंडेराया कारी, श्री भीमा खोरे, सिधूताई डोंगरे, जयकिसन कळम, यलम्मा दहिवाडी, श्रीगणेश सांगवी, दिलीप माने नंदूर आदी दूध संस्थानी नाव वगळ्याबाबत हरकती घेतल्या आहेत.

  सर्वाधिक हरकती या डिकसळ येथील जगदंबा दूध संस्थांनी ५ हरकती घेतल्या आहेत. तरी २९ डिसेंबर रोजी या घेण्यात आलेल्या हरकतीवर सुनावणी घेण्यात येणार आहे. तर ५ जानेवारी रोजी निर्णय देण्यात येणार आहे. १० जानेवारी रोजी अंतिम यादी प्रसिध्द केली जाणार आहे.

  प्रारूप मतदारयादीमधून वगळलेल्या अनेक दूध संस्था अशा आहेत. ज्या २० वर्षांपासून निवडणुका आणि दूध घालणे देखील बंद केले आहे. त्यामुळे जे दूध घालतात, निवडणुका घेतात आणि ऑडिट करतात अशाच दूध संस्थाची प्रारूप मतदारयादी लावली आहे.

  – आबासाहेब गावडे, सहाय्यक निबंधक

  ज्या दूध संस्था आस्तित्वातच नाहीत अशा दूध संस्था असून काहीच फायदा नाही. त्यामुळे प्रशासनाने जे केले ते योग्यच केले. माझ्या तालुक्यातील जवळपास ७० दूध संस्था अपात्र करण्यात आल्या आहेत.

  – मारूती लवटे, मा. संचालक