अकोल्यात कापसाला प्रति क्विंटल 11 हजार 845 रुपये दर; शेतकरी आनंदात

गेल्या पन्नास वर्षांनंतर पांढऱ्या सोन्याला ऐतिहासिक दर मिळाला आहे. अकोल्यातील अकोट बाजार समितीमध्ये कापसाला ११ हजार ८४५ मिळाल्याने आतापर्यंतचा सर्वोच्च दर आहे.

    अकोला : गेल्या पन्नास वर्षांनंतर पांढऱ्या सोन्याला ऐतिहासिक दर मिळाला आहे. अकोल्यातील अकोट बाजार समितीमध्ये कापसाला ११ हजार ८४५ मिळाल्याने आतापर्यंतचा सर्वोच्च दर आहे. मात्र या भावाचा फायदा व्यापाऱ्याला की शेतकऱ्याला असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत.

    बोन्ड अळी, निसर्गाची अवकृपा आदी कारणांमुळे गेल्या काही वर्षामध्ये राज्यात कापूस उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले. तर देशातील महाराष्ट्रासह अनेक राज्यात यावर्षी कापसाचे उत्पादन घटले आहे.

    दरम्यान यावर्षी कापसाला मिळत असलेला सर्वोच्च दर त्यामुळे येणाऱ्या काळ कापूस उत्पादक शेतकऱ्यांना चांगला राहू शकतो. दरम्यान आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाला चांगला दर मिळत असल्याने कापसाचे भाव दररोज तेजीकडे वाटचाल करणाऱ्या पांढऱ्या सोन्याला ऐतिहासिक दर मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

    शेतकऱ्यांचा ओढा बाजार समितीकडे

    अकोल्यातील अकोट बाजार समिती ही कापसाची मोठी बाजारपेठ समजली जाते. येथील कापसाची लिलाव पद्धत यामुळे देखील शेतकऱ्यांच्या पांढऱ्या सोन्याला चांगला दर मिळतो. त्यामुळे वऱ्हाडातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा ओढा या बाजार समितीकडे असतो. कापसाला ऐतिहासिक आणि विक्रमी दर मिळाल्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. येणारा काळ हा पांढऱ्या सोन्याला पिवळ्या सोन्यापेक्षाही चांगला भाव देणारा ठरो तरच बळीराजाला अच्छे दिन येतील यात शंकाच नाही.