दादरच्या पॅथ लॅबमधील १२ कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह

लॅबमध्ये काम करणा-या कर्मचा-याला कोरोनाची लागण झाली होती. महापालिकेच्या तपासणीत या लॅबमध्ये काम करणा-या १२ कर्मचा-यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. यानंतर आता दादर पश्चिमेला असलेली लाल पॅथ लॅब महापालिकेकडून सील करण्यात आली आहे. लॅबमध्ये काम करणाऱ्या एका कर्मचा-याला कोरोनाची लागण झाली होती.

    मुंबई (Mumbai) : कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन सध्या जगभरात धुमाकूळ घालत आहे. ओमायक्रॉनचे रुग्ण वाढत असून, भारतात तिस-या लाटेचा धोका वाढला आहे. त्यातच आता दादर येथील लाल पॅथ लॅबमधील १२ कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. या घटनेमुळे खळबळ उडाली असून, महापालिकेच्यावताने पॅथॉलॉजी लॅब सील करण्यात आली आहे .

    लॅबमध्ये काम करणा-या कर्मचा-याला कोरोनाची लागण झाली होती. महापालिकेच्या तपासणीत या लॅबमध्ये काम करणा-या १२ कर्मचा-यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. यानंतर आता दादर पश्चिमेला असलेली लाल पॅथ लॅब महापालिकेकडून सील करण्यात आली आहे. लॅबमध्ये काम करणाऱ्या एका कर्मचा-याला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर महापालिकेने त्याच्या संपर्कात आलेल्या ३९ जणांचा शोध सुरू केला आणि महापालिका लॅब पर्यंत पोहोचली. लॅब मधील कर्मचाऱ्यांची तपासणी केली असता १९ पैकी १२ जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहेत.