मुंबईत आज तब्बल 13 हजार 702 रुग्णांची नोंद, 6 जणांचा मृत्यू

मुंबईत आज एकूण 13 हजार 702 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर एकूण 20 हजार 849 जण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईतील रुग्ण बरे झाल्याचा दर हा 88 टक्के इतका झाला आहे. 

    मुंबई : कोरोना रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात झालेली वाढ गेल्या काही दिवसांपासून स्थिरावल्याचं चित्र आहे. मुबंईत गेल्या 24 तासांमध्ये दैनंदिन रुग्णसंख्येत घट झालेली आहे. पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा 14 हजारांच्या खाली आहे. तसेच मृतांचा आकडयाही क्वचित पण कमी झाला आहे. तसेच कोरोनाबाधितांपेक्षा बऱ्या झालेल्या रुग्णांचा आकडा हा जास्त आहे.

    मुंबईत आज एकूण 13 हजार 702 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर एकूण 20 हजार 849 जण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईतील रुग्ण बरे झाल्याचा दर हा 88 टक्के इतका झाला आहे.

    तसेच रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 36 दिवसांवर जाऊन पोहचला आहे. दिवसभरात 6 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.