
बारामती शहरातील जिल्हा क्रीडा संकुलानजिक १४ सदनिका अज्ञात चोरट्यांनी फोडून जवळपास साडे बावीस तोळे सोने व एक लाख रुपयांची रोकड लंपास केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेने बारामती हादरली आहे.
बारामती: बारामती शहरातील जिल्हा क्रीडा संकुलानजिक १४ सदनिका अज्ञात चोरट्यांनी फोडून जवळपास साडे बावीस तोळे सोने व एक लाख रुपयांची रोकड लंपास केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेने बारामती हादरली आहे.
गुरूवारी (दि १७) पहाटे तीन ते चारच्या सुमारास चार चाकी वाहनातून आलेल्या पाच ते सहा जणांच्या टोळीने बारामती शहारातील जिल्हा क्रीडा संकुला नजिक पाच अपार्टमेंटमधील जवळपास १४ सदनिकांचे कुलूप व कडी कोयंडे तोडून या घरफोड्या केल्या आहेत. या धक्कादायक घटनेने बारामती शहरातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.अतिरिक्त पोलिस अधीक्षक आनंद भोईटे, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे, पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांच्यासह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथकर घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी सर्व पाहणी करून तपासाची सूत्रे हालली आहेत. बंद सदनिकांना लक्ष्य केल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांनी दिली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून तातडीने तपास सुरू केला आहे.
दरम्यान पोलिसांची चार पथके तयार करण्यात आली असून चोरट्यांच्या गाडीचे व चोरट्यांचे सीसीटीव्ही फुटेज मिळाल्याची माहिती अतिरिक्त पोलीस अधीक्षक आनंद भोईटे यांनी दिली. ज्या फ्लॅटमध्ये घरफोड्या झाल्या आहेत त्यापैकी बऱ्याचशा सदनिका बंद अवस्थेतील आहेत. एकाच सदनिकेमध्ये जवळपास २० तोळे सोने चोरीला गेल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान बारामती शहरातील लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढली असून सदनिकांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर झाले आहे. पोलिसांनी स्थानिक नागरीकांचे सहकार्य घेऊन शहरात ग्राम सुरक्षा दलाप्रमाणे यंत्रणा कार्यान्वित करण्याची गरज असल्याचे नागरिकांनी सांगितले.