रस्ता ओलांडताना १४ वर्षीय मुलगा रिक्षाच्या धडकेत ठार

रस्ता ओलांडणाऱ्या एका १४ वर्षीय मुलाला सहा आसनी वाहनाने जोरदार धडक दिली. झालेल्या या अपघातात हा मुलगा जागीच ठार झाला. ही घटना सोमवारी (दि.२७) पहाटे ६ वाजण्याच्या सुमारास मोहोळ-पंढरपूर रस्त्यावरील पेनूर हद्दीत घडली. सागर राजेंद्र चव्हाण (रा. माटेगाव ता. गेवराई) असे त्याचे नाव आहे.

    मोहोळ / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : रस्ता ओलांडणाऱ्या एका १४ वर्षीय मुलाला सहा आसनी वाहनाने जोरदार धडक दिली. झालेल्या या अपघातात हा मुलगा जागीच ठार झाला. ही घटना सोमवारी (दि.२७) पहाटे ६ वाजण्याच्या सुमारास मोहोळ-पंढरपूर रस्त्यावरील पेनूर हद्दीत घडली. सागर राजेंद्र चव्हाण (रा. माटेगाव ता. गेवराई) असे त्याचे नाव आहे.

    याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पेनूर परिसरामध्ये ऊस तोडीच्या कामासाठी आलेले मजूर हे पेनूर परिसरात झोपडी करून राहतात. सोमवारी पहाटे सागर राजेंद्र चव्हाण हा युवक रस्ता ओलांडून प्रातविधीसाठी रस्ता ओलांडून जात असताना एका पांढऱ्या रंगाच्या अज्ञात वाहनाने जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात सागर चव्हाण हा युवक जागीच ठार झाला.

    दरम्यान, सहा आसनी वाहनचालकाने अपघातानंतर न थांबता तेथून पळ काढला. या अपघातप्रकरणी ज्ञानेश्वर अर्जुन चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, अज्ञात चालकाच्या विरोधात मोहोळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल अविनाश शिंदे हे करत आहेत.