जगावर जैविक युद्धाची टांगती तलवार, चीन-अमेरिकेसह १७ देशांकडे जैविक हत्यारांचा साठा

जागतिल महायुद्धात जैविक हत्यारांचा वापर करण्यात आल्यानंतर, अधिकांश देशांनी हे रोखण्यासाठी जिनिवा प्रोटकॉल करारावर स्वाक्षऱ्या केल्या होत्या. १९७२ साली जैविक हत्यारे कन्व्हेंशन झाले, १९७५ साली ते लागू करण्यात आले.

  नवी दिल्ली :  जैविक युद्ध आगामी काळात हू शतात, त्यासाठी तयार राहण्याची गरज, सीडीएस जनरल बिपीन रावत यांनी व्यक्त केली आहे. बिम्सटेक देशांना त्यांनी हे आवाहन केले आहे. ज्या जैविक युद्धांचा उल्लेख सीडीएस रावत यांनी केला आहे, ती नेमकी काय आहेत, आणि त्याचा इतिहास काय आहे, यावर एक नजर

  जैविक युद्ध म्हणजे नेमके काय
  मनुष्यात शरिरातील व्हायरसच्या वापराने लढण्यात आलेल्या युद्धाला जैविक युद्ध किंवा बायोलॉजिलक वॉर असे म्हणण्यात येते. ही जैविक हत्यारे कमी केळात, खूप मोठ्या क्षेत्रात मोठे नुकसान करु शकतात. या जैविक हत्यारांच्या सहाय्याने कोणत्याही देशांच्या नागरिकांमध्ये आजार, रोगराई निर्माण करणे, हा उद्देश असतो. यामुळे नागरिकांचे प्राण जातात, अनेक जण अपंग होतात किंवा त्यांना मानसिक विकारही जडू शकतात.

  जैविक हत्यारांचा वापर आत्तापर्यंत कधी झाला
  जैविक हत्यारांचा पहिल्यांदा वापर १३४७ साली झाला. तेव्हा मंगोल सेनेने प्लेग संक्रमित मृतदेह काफाच्या काळ्या समुद्राच्या तटावर फेकून दिले होते. यामुळे जहाजांतून मोठ्या संख्येने नागरिक संक्रमित होऊन इटलीत दाखल झाले. काळी महामारी पसरली. यात चार वर्षांत युरोपमध्ये २.५ कोटी जणांचा मृत्यू झाला

  १७१० साली स्वीडन सेनेशी लढणाऱ्या रशियन सैन्याने, एस्टोनियात या सैन्याला घेरुन त्यांच्यावर प्लेग संक्रमित मृतदेहांचा मारा केला होता.
  १७६३ साली ब्रिटिश सैन्याने, पिट्सबर्गमध्ये डेलावेअर इंडियन यांना घेरुन त्यांच्यावर चेचक वायरसने संक्रमित गोधड्या फेकल्या होत्या.

  विश्वयुद्धातही जैविक शस्त्रांचा वापर झाला होता का
  जर्मनीने पहिल्या महायुद्धात एन्थ्रेक्स नावाच्या जैविक हत्याराचा वापर केला होता. शत्रुंचे घोडे, गाई-गुरे या रोगामुळे संक्रमित होण्यासाठी गुप्तपणे कार्यक्रम राबविण्यात आला. सेंट पीटर्सबर्गमध्ये प्लेगचा फैलाव व्हावा, यासाठी प्रयत्न करण्यात आले. जपानने टायफाईडचा व्हायरस, रशियाच्या पाणीपुरवठ्याच्या पाईपलाईनमध्ये टाकला होता. हे पहिले युद्ध होते, ज्यात जैविक हत्यारांचा वापर करण्यात आला.

  जैविक युद्ध रोखण्यासाठी काय प्रयत्न
  जागतिल महायुद्धात जैविक हत्यारांचा वापर करण्यात आल्यानंतर, अधिकांश देशांनी हे रोखण्यासाठी जिनिवा प्रोटकॉल करारावर स्वाक्षऱ्या केल्या होत्या. १९७२ साली जैविक हत्यारे कन्व्हेंशन झाले, १९७५ साली ते लागू करण्यात आले.

  भारताने अशी जैविक हत्यारे विकसीत केलीत का
  नाही, भारताने अशी कोणतीही जैविक हत्यारे विकसीत केलेली नाहीत. अमेरिका, रशिया, चीन, जर्मनीसह १७ देशांनी अशी हत्यारे विकसीत केली आहेत.

  कोरोना हेही जैविक हत्यार आहे का
  कोरनाचा संसर्ग वाढल्यापासून चीनवर सातत्याने हा आरोप करण्यात येतो आहे. जैविक ह्तयार म्हणून चीनने कोरोनाचा उपयोग केल्याचे सांगण्यात येते आहे. मात्र अद्याप त्याची पुष्टी झालेली नाही.

  पेंटागॉनच्या अहवालात काय
  अमेरिकेच्या संरक्षण विभाग असलेल्या पेंटांगॉनने नुकत्याच जाहीर केलेल्या एका हवालात, चीन सातत्याने जैविक हत्यारांचे इन्फ्रास्टक्चर उभे करत असल्याची माहिती आहे. चीनकडून काही दुहेरी वापराचे टॉक्सिन तयार करण्यात येत आहेत. अमेरिकेने याबाबत चिंता व्यक्त केली आहे.