Beware! Swine flu reaches Gondia, citizens advised to be alert

महापालिका हद्दीतील ७७ तर नागपूर ग्रामीणमधील ३८ आणि जिल्ह्याबाहेरील ५० अशा एकूण १६७ रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

    नागपूर : राज्यात कोरोनाचं संकट अजून टळलं नाही आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्येत चढ-उतार पाहायला मिळत आहे. अशातच आता राज्यात स्वाईन फ्लूनं डोकं वर काढलं आहे. मागील २४ तासांत विविध रुग्णालयांत नवीन १७ स्वाइन फ्लूबाधितांची नोंद करण्यात आली आहे. जिल्यातील विविध रुग्णालयात १६७ रुग्ण उपचार घेत आहेत त्यापैकी तर २० रुग्ण व्हेंटिलेटवर असल्याची माहिती आहेत.

     

    जिल्हयात स्वाइन फ्लूनची सध्या दहशत आहे. सध्या शहरासहीत ग्रामीण भागातही स्वाईन फ्यू चे रुग्ण आढळतं आहेत. महापालिका हद्दीतील ७७ तर नागपूर ग्रामीणमधील ३८ आणि जिल्ह्याबाहेरील ५० अशा एकूण १६७ रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शहरातील ८, ग्रामीण भागातील ६ आणि जिल्ह्याबाहेरील ६ असे एकूण २० बाधित व्हेंटिलटवर आहेत. गेल्या २४ तासांत शहरात ११, जिल्ह्याबाहेरील (इतर जिल्हे व इतर राज्य) ६ असे एकूण १७ रुग्ण आढळले.तर, नागपुरातील ग्रामीण भागात गुरुवारी एकही स्वाइन फ्लूचा रुग्ण आढळला नसल्याची माहिती आहे. मेडिकल आणि मेयो, एम्ससह यासह शहरातील अनेक खासगी रुग्णालयात रुग्ण स्वाइन फ्लूवरी उपचार घेत आहेत. एप्रिलपासून तर आतापर्यंत विभागात ४३० स्वाइन फ्लूच्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर २५ जणांचा मृत्यू झाला आहे.