murder by firing

पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील तळेगावमध्ये १७ वर्षीय मुलाची डोक्यात गोळी झाडून हत्या (17 Years boy killed by Firing) केल्याची धक्कादायक घटना बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. या घटनेमुळे मावळ तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

    वडगाव मावळ : पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील तळेगावमध्ये १७ वर्षीय मुलाची डोक्यात गोळी झाडून हत्या (17 Years boy killed by Firing) केल्याची धक्कादायक घटना बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. या घटनेमुळे मावळ तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत मुलाचे वडील अनिल परदेशी यांनी याबाबत तळेगाव पोलिसांत तक्रार दिली आहे.

    दशांत अनिल परदेशी (रा तळेगाव ता मावळ) असे खून झालेल्या मुलाचं नाव असून, अज्ञात आरोपीचा शोध तळेगाव पोलीस घेत आहेत. तळेगाव दाभाडे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री उशिरा दशांत हा दुचाकी घेऊन घराबाहेर पडला होता. त्यानंतर तो घरीच आला नाही. त्यामुळे त्याचा शोध घरातील व्यक्ती आणि नातेवाईक घेत होते.

    दशांत शोध घेत असताना नॅशनल हेवी कंपनी येथे त्याचा मृतदेह आढळला आहे. त्याच्या डोक्यात गोळी झाडण्यात आल्याचं दिसून आलं. हा हत्येचा प्रकार असल्याची माहिती तळेगाव पोलिसांनी दिली आहे. विशेष म्हणजे ही घटना तळेगाव पोलीस ठाण्याच्या काही मीटर अंतरावर घडल्याने अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.