2 leaders killed in 12 hours! Kerala was shaken by the assassination of political leaders; Section 144 applies

12 तासांत दोन राजकीय नेत्‍यांच्‍या हत्‍येने केरळ हादरले आहे. केरळच्या अलाप्पुझा जिल्ह्यात विरोधी पक्ष भाजपा आणि सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया (एसडीपीआय) च्या दोन नेत्यांची हत्या करण्यात आली. या रक्तरंजीत राजकारणामुळे तिरुवनंतपुरम जिल्ह्यासह देवभूमी केरळमध्ये तणावाचे वातावरण आहे. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कलम 144 लावत जमावबंदी लागू केली आहे(2 leaders killed in 12 hours! Kerala was shaken by the assassination of political leaders; Section 144 applies).

  तिरुवनंतपूरम : 12 तासांत दोन राजकीय नेत्‍यांच्‍या हत्‍येने केरळ हादरले आहे. केरळच्या अलाप्पुझा जिल्ह्यात विरोधी पक्ष भाजपा आणि सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया (एसडीपीआय) च्या दोन नेत्यांची हत्या करण्यात आली. या रक्तरंजीत राजकारणामुळे तिरुवनंतपुरम जिल्ह्यासह देवभूमी केरळमध्ये तणावाचे वातावरण आहे. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कलम 144 लावत जमावबंदी लागू केली आहे(2 leaders killed in 12 hours! Kerala was shaken by the assassination of political leaders; Section 144 applies).

  भाजपा-एसडीपीआयचे एकमेकांवर आरोप

  एसडीपीआयचे राज्य सचिव के. एस. शान यांची शनिवारी संध्याकाळी हत्या करण्यात आली. ते घरी निघाले असताना त्यांची हत्या झाली. शान हे दुचाकीवरून घरी जात होते. त्यावेळी एका कारमधून आलेल्या टोळक्याने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या शान यांना कोच्चीतील एका हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी रात्री उशिरा दाखल करण्यात आले. तिथे त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली. एसडीपीआयने या प्रकरणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांवर हत्येचा आरोप केला आहे.

  या हत्येला 12 तास उलटत नाही तोच काही अज्ञातांनी केरळ भाजपचे ओबीसी विभागाचे सचिव रंजीत श्रीनावसन यांची घरात घुसून हत्या केली. यामुळे या दोन राजकीय हत्यांनी केरळ हादरले आहे. या दोन्ही हत्यांचा तपास केरळ पोलिसांकडून करण्यात येत आहे. भाजपा आणि एसडीपीआयने एकमेकांवर हत्येचे आरोप केले आहेत. रंजीत यांच्यावर चाकूने वार करण्यात आल्याचा आरोप भाजपने केला आहे.

  सीपीएम सरकारने केरळ जिहादींसाठी स्वर्ग बनविले

  मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी या हत्यांचा निषेध केला आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री विजयन यांनी कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. दरम्यान, सीपीएमच्या नेतृत्वाखालील केरळ सरकारने देवाची भूमी जिहादींसाठी स्वर्ग बनवल्याचा, आरोप भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस सी. टी. रवी यांनी केला. केंद्रीय मंत्री व्ही. मुरलीधरन यांनीही या हत्येचा निषेध केला. केरळमध्ये ‘गुंडाराज’ (अराजकतेने) आणखी एक अनमोल जीव घेतला.

  सीपीआयएमशासित राज्य आता ‘हत्येच्या मैदानात’ बदलत आहे. कायदा आणि सुव्यवस्था नाही. नागरिकांना संरक्षण नाही. मारेकरी मोकाट आणि फरार झाले आहेत. लज्जास्पद आहे, असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. एसडीपीआय पक्षाचे प्रमुख एमके फैजी यांनीही या हत्यासत्राचा निषेध केला आहे. राज्यात जातीय हिंसाचार घडवून जातीय सलोखा बिघडवणे हा संघ परिवाराच्या अजेंड्याचा एक भाग आहे. आरएसएसच्या दहशतवादाचा निषेध करा. केरळ पोलिसांची उदासीन वृत्ती ही आरएसएसच्या मनसुब्यांना चालना देणारी आहे, असा आरोप फैजी यांनी केला आहे.