
जालना : जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील गंगा चिंचोली शिवारातील 20 एकर ऊसाला आग लागून ऊस जळून खाक झाला आहे.
दरम्यान या आगीमुळे शेतकऱ्यांचे जवळपास एक कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. ही आग काल दुपारी लागली होती. तब्बल 20 एकर ऊस जळून खाक झाल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाले आहे.
ही घटना अंबड तालुक्यातील गंगा चिंचोली शिवारात घडली आहे. गंगा चिंचोली येथील सिताराम गायके, गोवर्धन श्रावणी, अर्जुन श्रावणी, प्रताप श्रावणी, पांडू श्रावणी, सुहास गायके आणि पंकज गायके या शेतकऱ्यांच्या ऊसाच्या पिकाचे नुकसान झाले आहे.
जळून खाक झालेला ऊस काढणीला आला होता. पण कुणी अज्ञात व्यक्तीनो ऊसाला आग लावली. ऊसाला आग लागल्याची माहिती मिळताच शेतकऱ्यांनी शेतात धाव घेवून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला पण आगीने बघता बघता रौद्र अवतार घेतला होता. यात 20 एकर ऊस जळून खाक झाला. यात शेतकऱ्यांच जवळपास एक कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
या शेतकऱ्यांनी पोलीसांना अज्ञाता विरोधात गुन्हा दैखल करण्याची मागणी केली पण पोलीसांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे गुन्हा दाखल न झाल्यास आत्मदहनाचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.