२०२१ ठरले निराशादायी; २०२२ मध्ये २०.५ कोटी लोक होणार बेरोजगार

जानेवारी-मार्च 2021 मध्ये शहरी भागातील (15 वर्षे आणि त्यावरील) महिलांसाठी बेरोजगारीचा दर 11.8 टक्क्यांवर पोहोचला आहे, जो एका वर्षापूर्वी 10.6 टक्के होता. तर ऑक्टोबर-डिसेंबर 2020 मध्ये ते 13.1 टक्के होते. पुरुषांसाठी, जानेवारी-मार्च 2021 मध्ये ते एका वर्षापूर्वीच्या याच कालावधीच्या तुलनेत 8.6 टक्क्यांवर स्थिर राहिले.

  दिल्ली,  2021 वर्ष नोकरी आणि करिअरच्या दृष्टीकोनातून जगभरातील लोकांसाठी निराशादायी ठरले आहे. यावर्षी बऱ्याच लोकांवर आपली नोकरी गमाविण्याची वेळ आली. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या (एनएसओ) अहवालातून रोजगाराबाबत धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.

  याचबरोबर, संयुक्त राष्ट्रसंघाच्या एका अहवालात कोरोना विषाणूच्या साथीमुळे झालेल्या अनपेक्षित विनाशामुळे पुढील वर्षी 20 कोटी लोक बेरोजगार होण्याची शक्यता वर्तविली आहे. सध्या 10.8 दशलक्ष कामगार ‘गरीब किंवा अत्यंत गरीब’ या श्रेणीत पोहोचले आहेत, असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

  जानेवारी-मार्चमध्ये बेरोजगारी दर 9.3%
  शहरी भागात 15 वर्षे आणि त्याहून अधिक वयोगटातील लोकांसाठी बेरोजगारीचा दर जानेवारी-मार्च 2021 मध्ये 9.3 टक्के झाला, जो गेल्या वर्षी याच कालावधीत 9.1 टक्के होता. एनएसओच्या सर्वेक्षणानुसार, ऑक्टोबर-डिसेंबर 2020 मध्ये शहरी भागात 15 वर्षे आणि त्याहून अधिक वयोगटातील लोकांसाठी सीडब्ल्यूएस (वर्तमान साप्ताहिक स्थिती) बेरोजगारीचा दर 10.3 टक्के होता.

  जानेवारी-मार्च 2021 मध्ये शहरी भागातील (15 वर्षे आणि त्यावरील) महिलांसाठी बेरोजगारीचा दर 11.8 टक्क्यांवर पोहोचला आहे, जो एका वर्षापूर्वी 10.6 टक्के होता. तर ऑक्टोबर-डिसेंबर 2020 मध्ये ते 13.1 टक्के होते. पुरुषांसाठी, जानेवारी-मार्च 2021 मध्ये ते एका वर्षापूर्वीच्या याच कालावधीच्या तुलनेत 8.6 टक्क्यांवर स्थिर राहिले. ऑक्टोबर-डिसेंबरमध्ये हा बेरोजगारीचा दर 9.5 टक्के होता.

  ऑक्टोबर-डिसेंबरमध्ये 10.3%
  ऑक्टोबर-डिसेंबर 2020 मध्ये शहरी भागातील सर्व वयोगटातील बेरोजगारीचा दर 10.3 टक्क्यांवर पोहोचला, जो एका वर्षापूर्वी याच महिन्यांत 7.9 टक्‍क्‍यांवर होता. बेरोजगारी किंवा बेरोजगारीचा दर (यूआर) कामगार दलातील बेरोजगार व्यक्तींची टक्केवारी म्हणून परिभाषित केला जातो. नवव्या पीरियडिक लेबर फोर्स सर्व्हेनुसार (पीएलएफएस) शहरी भागातील सर्व वयोगटातील बेरोजगारीचा दर जुलै-सप्टेंबर 2020 मध्ये 13.3 टक्के होता.