
ज्यांनी राष्ट्राचे सार्वभौमत्व आणि अखंडता वाचवण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली, त्यांना नमन. त्यांनी मातृभूमीच्या प्रत्येक कणाला आपले सर्वस्व मानले. आता अदमान-निकोबारची ही बेटे आता २१ परमवीर चक्राने सन्मानित सैनिकांच्या नावाने ओळखली जातील.
आज (23 जानेवारी) नेताजी सुभाषचंद्र बोस (Subhash Chandra Bos) यांची जंयती हा दिवस पराक्रम दिवस या नावाने ओळखला आहे. या औचित्यावर देशात शूरविरांच्या सन्मानार्थ महत्त्वाच पाऊल उचलण्यात आलं. अंदमान आणि निकोबारच्या 21 बेटांची नावे देण्यात आली आहेत. ही नावे 21 परमवीर चक्राने सन्मानित सैनिकांच्या नावावर ठेवण्यात आली आहेत.पंतप्रधान मोदींनी (PM Modi Named 21 Islands in andman and nicoba) या बेटांच्या नावांची घोषणा केली.
या नामकरण सोहळ्यात पंतप्रधान व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले होते. नेताजींना समर्पित राष्ट्रीय स्मारकाच्या मॉडेलचेही त्यांनी अनावरण केले. या कार्यक्रमाचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. यावेळी नरेंद्र मोदीं म्हणाले की, ज्यांनी राष्ट्राचे सार्वभौमत्व आणि अखंडता वाचवण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली, त्यांना नमन. त्यांनी मातृभूमीच्या प्रत्येक कणाला आपले सर्वस्व मानले. आता अदमान-निकोबारची ही बेटे आता २१ परमवीर चक्राने सन्मानित सैनिकांच्या नावाने ओळखली जातील.
Naming of 21 islands of Andaman & Nicobar Islands after Param Vir Chakra awardees fills heart of every Indian with pride. https://t.co/tKPawExxMT
— Narendra Modi (@narendramodi) January 23, 2023
‘या’ 21 शूरवीरांच्या नावावरुन बेटांना नाव देण्यात आली आहेत
– 1- मेजर सोमनाथ शर्मा
२- सुभेदार आणि मानद कॅप्टन (माजी लान्स नाईक) करम सिंग
3- द्वितीय ले.राम राघोबा राणे
4- नायक जदुनाथ सिंह
5- कंपनी हवालदार मेजर पिरू सिंग
6- कॅप्टन जीएस सलारिया
७- लेफ्टनंट कर्नल (माजी मेजर) धनसिंग थापा
8- सुभेदार जोगिंदर सिंग
9- मेजर शैतान सिंग
10- CQMH अब्दुल हमीद
11- लेफ्टनंट कर्नल अर्देशीर बुर्जोरजी तारापोर
12- लान्स नाईक अल्बर्ट एक्का
13- मेजर होशियार सिंग
14- दुसरे लेफ्टनंट अरुण खेतरपाल
15- फ्लाइंग ऑफिसर निर्मलजीत सिंग सेखों
16- मेजर रामास्वामी परमेश्वरन
17- नायब सुभेदार बाना सिंग
18- कॅप्टन विक्रम बत्रा
19- लेफ्टनंट मनोजकुमार पांडे
20- सुभेदार मेजर (तत्कालीन रायफलमन) संजय कुमार
21- सुभेदार मेजर सेवानिवृत्त (माननीय कॅप्टन) ग्रेनेडियर योगेंद्र सिंह यादव
2018 मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या स्मरणार्थ अंदमान आणि निकोबारच्या रॉस बेटांचे नाव बदलून नेताजी सुभाषचंद्र बोस बेट असे करण्यात आले होते. नील द्वीप आणि हॅवलॉक द्वीपचे नाव बदलून शहीद द्वीप आणि स्वराज द्वीप करण्यात आले .