नेहमीप्रमाणे पेट्रोल पंपावर पेट्रोल भरायला गेला अन् जीव गमावला, घाटकोपर दुर्घटनेत 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू

घाटकोपर येथील एक 22 वर्षीय तरुण पेट्रोल भरण्यासाठी पंपावर गेला होता. त्यादरम्यान होर्डिंग पडले आणि त्याचा मृत्यू झाला.

    मुंबई : मुंबईत सोमवारी दुपारनंतर अचानक सुरू वादळी वारा सुटला आणि पावसाला सुरवात झाली. या पावसामुळे घाटकोपर परिसरात अनेकांनी पेट्रोलपंप खाली आसरा घेतला. मात्र हा आसरा घेणचं अनेकांच्या जीवावर बेतलं. पेट्रोलपंपावर होर्डिंग पडल्याने झालेल्या दुर्घटनेत (Ghatkopar Hoarding Collapse) 14 जणांना जीव गमवावा लागला तर, 74 जण जखमी झाले. सध्या जखमींवर राजावाडी तसेच इतर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेत एका 22 वर्षीय तरुणालाही आपला जीव गमवावा लागला आहे. तो नेहमीप्रमाणे घरी जाण्यापुर्वी पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी गेला होता पण त्याला होर्डींग पडल्याने त्याला मृत्यू झाला.

    वादळी वाऱ्यानं पडलं भलमोठं होर्डिंग

    सोमवारी अचानक मुंबईतील वडाळा, घाटकोपर, कुर्ला भागात वादळी वाऱ्यासाह पावसाला सुरुवात झाली.अचानक आलेल्या पावसाने अनेकांची तारांबळ उडाली. अनेक चाकरमानी ऑफिस सुटल्यानंतर घराच्या दिशेने निघाले होते. पण रस्त्यात धूळीनं भरलेलं वादळ आणि पाऊस आल्याने अनेकांनी मिळेत तिथं आसरा शोधला. घाटकोपर परिसरातही वादळी वाऱ्यासह पाऊस आला यावेळी अनेकांनी पेट्रोल पंपावर आडोसा घेतला पण त्याचवेळी भलंमोठं होर्डिंग पेट्रोलपंपावर पडलं. या दुर्घटनेत आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झाला असून 74 जण जखमी आहेत.

    दुर्घटनेत 22 वर्षिय तरुणाचा मृत्यू

    या दुर्घटनेत डिलिव्हरीचं काम करणारा भरत राठोड (वया, 22)  याचाही दुर्देवी मृत्यू झाला. भरत हा घरामध्ये कर्ता मुलगा होता. तो पेट्रोल भरण्यासाठी पंपावर गेला होता. त्यादरम्यान होर्डिंग पडले आणि त्याचा मृत्य झाला. आई करोनामध्ये गेल्यानंतर बहीण आणि भावाचा भरत हाच आधार होता. या दुर्घटनेत कुटुंबाने आधार गमावला आहे.