२५ वर्षीय युवकाचा तलावात बुडून मृत्यू; गोंदिया जिल्ह्यातील घटना

    गोंदिया (Gondia) : जिल्ह्यातील आमगाव तालुक्यातील कुंभारटोली येथील 25 वर्षीय नवल शिवचरण कनपुरिया या युवकाचा आज नवतलावात बुडून मृत्यू झाला. मृतक हा आपल्या घराजवळील धन्नालाल रामटेके यांच्या इथे अंत्यविधीसाठी आलेल्या पाहुण्यांसोबत घराजवळील नवतलावात सकाळी आंघोळ करण्याकरिता गेला होता.

    तो पाण्यामध्ये खोलवर गेल्याने त्याच्या मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज लावण्यात येत आहे. नवल कनपुरिया यांचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आलाय. मृतदेहाच्या पंचनामा करून मृतदेह ग्रामीण रुग्णालय येथे शवविच्छेदनाकरिता पाठविण्यात आले आहे.