बिटकॉईनमध्ये २६% घसरण; बंदीचा कायदा येण्यापूर्वीच क्रिप्टोकरन्सीला झटका

बिटकॉईनमध्ये ( Bitcoin) 15 टक्क्यांनी घसरण झाली. तर त्यापाठोपाठ इथेरममध्ये 12, टेथरमध्ये 6%  आणि युएसडी कॉईनमध्ये जवळपास 8% घसरण Penr. भारतात बिटकॉईनची किंमत 15 टक्क्यांनी घसरून 40,28,000 रुपयांवर आली.

  दिल्ली, केंद्र सरकार खासगी क्रिप्टोकरन्सीवर बंदी घालणार असल्याचे वृत्त धडकताच मंगळवारी याचा परिणाम अनेक क्रिप्टोकरन्सींच्या (Cryptocurrency) दरावर झाला. 26 टक्क्यांपर्यंत क्रिप्टोकरन्सीमध्ये घसरण झाल्याचे दिसून आले.  मोदी सरकार हिवाळी अधिवेशनात ‘द क्रिप्टो करन्सी ॲण्ड रेग्युलेशन ऑफ ऑफिशियल डिजिटल करन्सी बिल-2021’  मांडणार आहे.

  या वृत्तानंतर क्रिप्टोकरन्सीचे दर घसरले. बिटकॉईनमध्ये ( Bitcoin) 15 टक्क्यांनी घसरण झाली. तर त्यापाठोपाठ इथेरममध्ये 12, टेथरमध्ये 6%  आणि युएसडी कॉईनमध्ये जवळपास 8% घसरण Penr. भारतात बिटकॉईनची किंमत 15 टक्क्यांनी घसरून 40,28,000 रुपयांवर आली. तर एथरमची किंमत 3,05,114 रुपये, टीथरची किंमत 76 रुपये, कारडानोची किंमत 137 रुपयांपर्यंत खाली आली.

  क्रिप्टो       चलनाची घसरण
  बिटकॉइन     29.15%
  यार्न फायनान्स 29.74%
  इथरियम      26.95%
  मेकर          25.85%
  फाईलकॉईन     30.05%

  डिजिटल करन्सीचा मार्ग खुला ठेवणार
  खासगी क्रिप्टोकरन्सीवर बंदी आणणतानाच केंद्र सरकार रिझर्व्ह बँकेच्या माध्यमातून डिजिटल करन्सींचा मार्ग खुला ठेवणार असल्याची माहिती आहे. रिझर्व्ह बँकेच्या माध्यमातून डिजिटल करन्सी आणण्यासाठी कायदेशीर चौकट तयार करण्याची तरतूद या विधेयकात केली जाणार आहे.

  जगात 7 हजारांहून अधिक नाणी चलनात
  2013 पर्यंत जगात बीटकॉईन ही एकच क्रिप्टोकरन्सी होती, पण सध्या जगभरात 7 हजाराहून अधिक भिन्न क्रिप्टो नाणी चलनात आहेत. हे एक प्रकारचे डिजिटल नाणे आहेत. बिटकॉइनची सुरुवात 2009 झाली होती