The renaming of schools after cities and airports; All Mumbai Municipal Corporation schools will be renamed

ओमायक्रॉनचा झपाटयाने प्रसार होत आहे. त्यातच लहान मुलांचे लसीकरण न होणे यामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. बुधवारपासून प्रत्यक्ष सुरु झालेल्या शाळेत मुलाला न पाठवण्याच्या मनस्थितीत पालक असल्याचे स्पष्ट झाले आहे. मुंबई महापालिकेच्या शाळेत ५ लाख ९१ हजार ८८२ विद्यार्थी शिक्षण घेत असताना बुधवारी प्रत्यक्ष २ लाख ६३९ विद्यार्थी शाळेत उपस्थित होते.ओमायक्रॉनचा धोका लक्षात घेता तब्बल ३ लाख ९१ हजार २४३ पालकांनी मुलाला शाळेत पाठवण्यास नापसंती दर्शवली आहे(4 lakh parents dislike sending students to school; Attendance of 2 lakh 629 students on the first day only).

    मुंबई : ओमायक्रॉनचा झपाटयाने प्रसार होत आहे. त्यातच लहान मुलांचे लसीकरण न होणे यामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. बुधवारपासून प्रत्यक्ष सुरु झालेल्या शाळेत मुलाला न पाठवण्याच्या मनस्थितीत पालक असल्याचे स्पष्ट झाले आहे. मुंबई महापालिकेच्या शाळेत ५ लाख ९१ हजार ८८२ विद्यार्थी शिक्षण घेत असताना बुधवारी प्रत्यक्ष २ लाख ६३९ विद्यार्थी शाळेत उपस्थित होते.ओमायक्रॉनचा धोका लक्षात घेता तब्बल ३ लाख ९१ हजार २४३ पालकांनी मुलाला शाळेत पाठवण्यास नापसंती दर्शवली आहे(4 lakh parents dislike sending students to school; Attendance of 2 lakh 629 students on the first day only).

    कोरोना आणि आता ओमायक्रॉनने जगाला चिंतेत टाकले आहे.ओमायक्रॉनचा झपाटयाने प्रसार होत असून विद्यार्थ्यांचे लसीकरण झालेले नाही. त्यामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. बुधवारपासून सुरु झालेल्या शाळेत विद्यार्थ्यांना पाठवण्यास पालकांनी नकार दिल्याचे पालिकेच्या शिक्षण विभागाने दिलेल्या आकडेवारीतून समोर आले आहे.

    मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये १ ली ते ७ वी चे ५ लाख ९१ हजार ८८२ विद्यार्थी शिक्षण घेत असून यापैकी फक्त २ लाख ६३९ म्हणजे ३४ टक्के विद्यार्थ्यांची शाळेत प्रत्यक्ष शिक्षण घेण्यासाठी उपस्थिती असल्याचे दिसून आले. ओमायक्रॉन विषाणुचा प्रसार झपाटयाने होत असला तरी घातक नसल्याचे मत आरोग्य तज्ञांनी व्यक्त केले आहे. त्यात टास्क फोर्सने शाळा भरविण्यास हरकत नसल्याचे स्पष्ट केल्यानंतर बुधवारपासून मुंबईतील शाळा गजबजतील असे चित्र निर्माण झाले होते.

    मात्र, ओमायक्रॉनचा वाढता प्रसार पहाता पालिका शाळांतील ५ लाख ९१ हजार ६३९ विद्यार्थ्यांपैकी बुधवारी प्रत्यक्ष २ लाख विद्यार्थी शाळेत उपस्थित होते. तर १ ली ते ७ वी पर्यंतचे २१ हजार ३१० शिक्षक शिक्षकेतर कमर्चारी असून यापैकी २० हजार २१२ शिक्षक शिक्षकेतर कर्मचारयांचे लसीकरण पूर्ण झाल्याचे शिक्षणाधिकारी राजू तडवी यांनी सांगितले.

    महापालिकेच्या सर्व शाळांना विद्यार्थ्यांसाठी मास्क , थर्मल गन, प्लस आॅक्सिमिटर, इमारत निर्जंंतुकीकरणासाठी सोडियम हायपोक्लोराईड आदिंचा पुरवठा करण्यात आला असून शाळांमधील इमारतींचे निर्जंतुकीकरण शंभर टक्के पूर्ण झाल्याचे ते म्हणाले.