दोन दिवस 14 तासांच्या परिश्रमातून साकारली 48 चौरस फुटांची ‘सत्तानाट्या’वर रांगोळी!

अमित यांनी  6 फूट बाय 8 फूट आकाराची ही रांगोळी साकारली आहे. त्यात 10 ते 12 किलो पांढऱ्या रांगोळीचा व पिगमेंट तसेच विविध रंगाचा वापर केला आहे.

    औरंगाबाद : गेल्या आठ-दहा दिवसापासून महाराष्ट्रात चाललेल्या सत्तानाट्याने संपूर्ण देशाचे लक्ष वेधले होते. अखेर एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांचे सरकार सत्तारूढ झाल्यानंतर या सत्तानाट्याला स्वल्पविराम मिळाला. या निमित्ताने औरंगाबादेतील रांगोळी कलाकार मृणाल गजभिये, आर्किटेक्ट अमित देशपांडे यांनी 14 तासांच्या अथक परिश्रमातून या सत्तानाट्याच्या निकालावर आधारीत एक रांगोळी साकारली.

    अमित देशपांडे यावेळी बोलताना म्हणाले की, मी कंपनीतून घरी आलो असतो विचार करत होतो की रांगोळी बनवावी. मुख्यमंत्री फडणवीस साहेब होतील म्हणून परंतु त्यांची पत्रकार परिषद सुरू असताना त्यांनी अचानकपणे एकनाथ शिंदे यांचे नाव जाहीर केलं त्यामुळे परत मला रांगोळीचा जो विचार होता तो बदलावा लागला कारण की पत्रकार परिषदेत ते म्हणाले होते की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे होतील आणि मी मंत्रीमंडळात मध्ये राहणार नाही, असे त्यांनी म्हटले होते. नंतर लगेच एक तासानंतर परत त्यांचं नाव उपमुख्यमंत्री पदासाठी जाहीर झालं. त्यावेळेस पण माझ्या मनात जी रांगोळी होती ती परत बदलून मला आणखी दुसरी रांगोळी तयार करावी लागली म्हणजे या दोन-तीन तासाच्या नाट्यामध्ये माझ्या मनातील रांगोळीचा तीन वेळेस लुक बदलावा लागला. अमित यांनी  6 फूट बाय 8 फूट आकाराची ही रांगोळी साकारली आहे. त्यात 10 ते 12 किलो पांढऱ्या रांगोळीचा व पिगमेंट तसेच विविध रंगाचा वापर केला. सायंकाळी 6 ते मध्यरात्री 1 असे दोन दिवस प्रत्येकी 7 तास परिश्रम मेहेनत घेऊन ही रांगोळी तयार करण्यात आली.