बांगलादेशात ६० लाख लोक पुरामुळे बाधित, मदतीसाठी लष्कराला आवाहन

बांगलादेशमध्ये संततधार पाऊस आणि पुरामुळे 6 दशलक्ष लोक बाधित झाले आहेत. या नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर देशाने मदत आणि बचाव कार्यासाठी लष्कराला पाचारण केले आहे.

    ढाका : बांगलादेशमध्ये संततधार पाऊस आणि पुरामुळे 6 दशलक्ष लोक बाधित झाले आहेत. या नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर देशाने मदत आणि बचाव कार्यासाठी लष्कराला पाचारण केले आहे.
    अधिकृत अंदाजानुसार, सुमारे सहा दशलक्ष लोक पुरामुळे प्रभावित झाले आहेत. नागरिकांच्या घरांमध्ये पाणी घुसले आहे आणि अनेक लोक तात्पुरत्या छावण्यांमध्ये राहत आहेत.  देशाच्या उत्तर-पूर्व आणि उत्तरेकडील प्रदेशातील नद्यांमध्ये पाण्याची पातळी वाढत आहे.फ्लड फोरकास्टिंग अँड वॉर्निंग सेंटर (FFWC) च्या प्रवक्त्याने सांगितले की, “देशातील चार प्रमुख नद्यांपैकी दोन नद्यांमधील पाण्याची पातळी धोक्याच्या चिन्हापेक्षा जास्त आहे आणि परिस्थिती जवळपास 2004 च्या पुरासारखी आहे”
    या  पुरामुळे किती लोकांचा मृत्यू झाला याची अधिकृत आकडेवारी अद्याप उपलब्ध नाही. अनौपचारिक आकडेवारीनुसार, देशात किमान 19 लोकांचा मृत्यू झाला आहे. FFWC ने पुराचे कारण मेघालय आणि बांगलादेशच्या उंच भागात सतत पडणाऱ्या पाऊस म्हटले आहे. पुराच्या पाण्यामुळे अनेक वीज केंद्रांवर पाणी साचले असून, प्रशासनाला ही वीज केंद्रे बंद करण्यास भाग पाडले आहे, परिणामी इंटरनेट आणि मोबाईल फोन संपर्क बंद झाला आहे. दरम्यान, बांगलादेशने प्रशासनाच्या मदतीसाठी लष्कराला पाचारण केले आहे.