पाटण नगरपंचायतीसाठी ७३.५४ टक्के मतदान

पाटण नगरपंचायतीच्या (Patan Nagar Panchayat) १७ प्रभागापैकी १३ प्रभागांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मंगळवारी (दि.२१) झालेल्या चुरशीच्या मतदानात एकूण ७३.५४ टक्के मतदान झाले. एकूण ७ हजार ६६ मतदारांपैकी २ हजार ६९९ पुरुष व २ हजार ५८६ महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सुनील गाढे व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अभिषेक परदेशी यांनी दिली.

  पाटण / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : पाटण नगरपंचायतीच्या (Patan Nagar Panchayat) १७ प्रभागापैकी १३ प्रभागांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मंगळवारी (दि.२१) झालेल्या चुरशीच्या मतदानात एकूण ७३.५४ टक्के मतदान झाले. एकूण ७ हजार ६६ मतदारांपैकी २ हजार ६९९ पुरुष व २ हजार ५८६ महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सुनील गाढे व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अभिषेक परदेशी यांनी दिली.

  मंगळवारी सकाळी ७.३० वाजल्यानंतर पाटण शहरातील सर्व १३ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रियेस प्रारंभ करण्यात आला. सकाळी १० वाजल्यानंतर मतदानाला गती आली. दुपारी ३.३० वाजेपर्यंत ६६ टक्के मतदान झाले. दुपारनंतर सर्वच मतदान केंद्रावर मतदानासाठी रांगा लागल्या होत्या.

  एकूण १३ प्रभागांवर झालेले मतदान पुढीलप्रमाणे :

  प्रभाक क्र. १ मध्ये ६२२ पैकी एकूण ४४१ (७०.९टक्के) मतदान झाले. प्रभाग क्र. २ मध्ये ४३९ पैकी ३४७ (७९.४ टक्के), प्रभाग क्र. ४ मध्ये ५६५ पैकी ४६९ (८३ टक्के), प्रभाग क्र. ५ मध्ये ५५३ पैकी ३८६ (६९.८ टक्के), प्रभाग क्र. ६ मध्ये ६११ पैकी ४८४ (७९.२ टक्के), प्रभाग क्र. ७ मध्ये ५१८ पैकी ३२१ (६१.९ टक्के), प्रभाग क्र. ९ मध्ये ७३३ पैकी ४४७ (६०. ९ टक्के). प्रभाग क्र. ११ मध्ये ५४९ पैकी ४२८ (७९.११), प्रभाग क्र. १२ मध्ये ३६८ पैकी २४७ (६७.१२), प्रभाग क्र. १४ मध्ये ४५९ पैकी ३७४ (८१.४ टक्के), प्रभाग क्र. १५ मध्ये ५३२ पैकी ३७८ (७१.५), प्रभाग क्र. १६ मध्ये ४३७ पैकी ३१६ (७२.३ टक्के) व प्रभाग क्र. १७ मध्ये ६८८ पैकी ५५९ (८१.२) एवढ्या मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.

  पाटण शहरातील अतिसंवेदनशील असणाऱ्या मतदान केंद्रांवरही मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आल्याने पाटण शहराला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. बुधवारी (दि.१९) जानेवारी २०२२ बाळासाहेब देसाई महाविद्यालयाच्या क्रीडा हॉलमध्ये मतमोजणी होणार असून, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून रहिले आहे.

  उमेदवार व पोलिसांत शाब्दिक चकमक

  पाटण शहरात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी उमेदवारांसाठी ओळखपत्र दिलेले असतानाही काही पोलीस कर्मचाऱ्यांनी मतदान केंद्रावर जाण्यास उमेदवारांना मज्जाव केला. त्यावेळी उमेदवार व पोलीस कर्मचारी यांच्यात शाब्दिक चकमक झाल्याने काही काळ वातावरण तंग बनले होते. पोलीस कर्मचाऱ्यांच्या वागणुकीमुळे नागरिकांमधून संताप व्यक्त करण्यात येत होता.