वडूज नगरपंचायत निवडणुकीत ७६ टक्के मतदान

मागील सुमारे दीड महिना अतिशय रंजकपणे चाललेली वडूज नगरपंचायतची रणधुमाळी शांततेत पार पडली. मागील आठवड्यात विविध पक्षाचे मंत्री, आमदार, नेते आदींनी आपापल्या पक्षाच्या उमेदवारांना धीर देत विरोधकांवर टीकाटिप्पणी केली. अखेर मंगळवारी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत ही मतदान प्रक्रिया पार पडली.

  वडूज : मागील सुमारे दीड महिना अतिशय रंजकपणे चाललेली वडूज नगरपंचायतची रणधुमाळी शांततेत पार पडली. मागील आठवड्यात विविध पक्षाचे मंत्री, आमदार, नेते आदींनी आपापल्या पक्षाच्या उमेदवारांना धीर देत विरोधकांवर टीकाटिप्पणी केली. अखेर मंगळवारी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत ही मतदान प्रक्रिया पार पडली.

  वडूज नगरपंचायत एकूण १७ सदस्य व दोन स्वीकृत अशी एकूण १९ सदस्यसंख्या असलेली नगरपंचायत असून, १३ सदस्यांच्या निवडीचे मतदान पार पडले. तर उर्वरित चार प्रभाग निवडणूक मतदान ओबीसी आरक्षणामुळे लांबणीवर पडल्याने १८ जानेवारीला खुल्या विभागाने होणार आहे.

  दरम्यान, मंगळवारी (दि.२१) झालेल्या या मतदान प्रक्रियेत १३ प्रभागातून सुमारे अर्धशतक भर उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले होते. मतदान सकाळी साडेसात वाजता सुरु झाल्यानंतर प्रशासनाने ओमायक्रॉन व्हायरसच्या पार्श्वभूमीवर केलेल्या संचारबंदी आदेशानुसार गर्दी, गोंधळ न करता येथील मतदारांनी मतदान केले. तरीही एकूण ७६ टक्के मतदान झाले.

  यामध्ये प्रभाग १, ५, १४, १७ सोडून उर्वरित प्रभागात एकूण मतदान व झालेले मतदान आकडेवारी कंसात

  प्रभाग २ मध्ये एकूण मतदार ८१२ (६७८) प्रभाग ३ – ११५७ (९३६), प्रभाग ४ – ५५८(४६४)

  प्रभाग ६ – १३८८ (१०२८), प्रभाग ७ – ८५१ (७२०), प्रभाग ८ – ९०५ (७०४),

  प्रभाग ९ – ५१० (३७९) प्रभाग १० – ८१७ (५१०) प्रभाग ११ ९३७ (६५८) प्रभाग १२ – २७९ (२२८) प्रभाग १३
  ११७८ (८३३) प्रभाग १५-६५० (५३०) प्रभाग १६ – ११३४ (८०१) याप्रमाणे असून, एकूण १५ हजार १९१ मतदारांपैकी ८ हजार ४६९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.