
अनंतपूर जिल्ह्यातील धर्मावरम येथील राजेंद्र नगर येथील वेणूचे, चित्तूर जिल्ह्यातील नारायणवनम भागातील एका मुलीशी लग्न होत होते. रविवारी सकाळी थिरुचनूरमध्ये लग्णसोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. वेणू (वधू) चे कुटुंबीय इतर ६३ जणांसह एका खाजगी बसमधून दुपारी ३.३० वाजता धर्मावरमहून निघाले.
आंध्र प्रदेश : आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यातील भाकरपेटा कनुमा येथे मदनपल्ले-तिरुपती महामार्गाजवळ एका खासगी बस दरीत कोसळून झालेल्या अपघातात आठ जण ठार, तर ४५ जण जखमी झाले आहेत. या घटनेत एक मुलगा आणि एका महिलेसह आठ जणांचा मृत्यू झाला. सुमारे ६३ प्रवासी घेऊन जाणारी बस ओव्हरस्पीडमुळे दरीत कोसळली. बचाव पथकांनी घटनास्थळावरून सहा मृतदेह बाहेर काढले आहेत.
या घटनेत मलिशेट्टी वेंगप्पा (६०), मालीशेट्टी मुरली (४५), कंथम्मा (४०), मालीशेट्टी गणेश (४०), जे. यशस्विनी (८), चालक नबी रसूल आणि क्लिनर यांचा मृत्यू झाला आहे. जखमींपैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जखमींना तिरुपतीच्या रुग्णालयांत हलवण्यात आले आहे.
अनंतपूर जिल्ह्यातील धर्मावरम येथील राजेंद्र नगर येथील वेणूचे, चित्तूर जिल्ह्यातील नारायणवनम भागातील एका मुलीशी लग्न होत होते. रविवारी सकाळी थिरुचनूरमध्ये लग्णसोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. वेणू (वधू) चे कुटुंबीय इतर ६३ जणांसह एका खाजगी बसमधून दुपारी ३.३० वाजता धर्मावरमहून निघाले. चित्तूर जिल्ह्यातील पीलेरू येथे रात्री ढाब्यावर सर्वांनी जेवण केले. त्यांनी पुन्हा प्रवास सुरू केला आणि भाकरपेटा घाट गाठला. वळण घेताना चालकाचे नियंत्रण सुटले आणि ते दरीत कोसळले.