कण्हेर येथे टेम्पो पलटी होऊन आठजण जखमी

रविवारी सकाळी सुमारे साडेआठ ते नऊ वाजण्याच्या सुमारास मेढा येथुन छोटा हत्ती टेम्पो मजुरांना घेऊन साताराकडे येत असताना कण्हेर, ता. सातारा गावच्या हद्दीत हॉटेल साई सागरसमोर टेम्पोचालकाने उतारावर टेम्पोला अचानक ब्रेक मारल्याने चालकाचे छोटा हत्ती टेम्पोवरील नियंत्रण सुटून टेम्पो रस्त्याच्या साईड पट्टीवरून खाली येऊन पलटी झाला.

    सातारा : कण्हेर, ता. सातारा गावच्या हद्दीत छोटा हत्ती टेम्पो पलटी होऊन झालेल्या अपघातात आठ मजूर जखमी झाले. टेम्पो उतारावरून येत असताना चालकाने अचानक ब्रेक मारून नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येते.

    याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, रविवारी सकाळी सुमारे साडेआठ ते नऊ वाजण्याच्या सुमारास मेढा येथुन छोटा हत्ती टेम्पो मजुरांना घेऊन साताराकडे येत असताना कण्हेर, ता. सातारा गावच्या हद्दीत हॉटेल साई सागरसमोर टेम्पोचालकाने उतारावर टेम्पोला अचानक ब्रेक मारल्याने चालकाचे छोटा हत्ती टेम्पोवरील नियंत्रण सुटून टेम्पो रस्त्याच्या साईड पट्टीवरून खाली येऊन पलटी झाला.

    या अपघातात विजय बहादुर (वय २०), चंदन यादव (वय ७९), होननाथ प्रजापती (वय २०), अनिल कल्याण माने (वय ५३), राजेंद्र तुकाराम डेबे (वय ३३), शितल राठोड (वय ४०), गिता राठोड (वय २०), अनिल बासू राठोड (वय ४०) हे आठ जण (जखमींची पूर्ण नावे व पत्ते समजू शकले नाहीत) जखमी झाले.

    हा अपघाताची समजताच जिल्हा परिषद सदस्य दीपक पवार यांनी ही माहिती १०८ रुग्णवाहिका चालक मनोज देवकर, रा. कोरेगाव यांना दिली. मनोज देवकर तात्काळ रुग्णवाहिका घेऊन घटनास्थळी दाखल झाले. ग्रामस्थांच्या मदतीने जखमींना रुग्णवाहिकेमध्ये बसवुन त्यांना तात्काळ येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.