नव्याने शहरात ८० कोरोनाबाधित

शहर आणि शहराबाहेरील एकाही रुग्णाच्या मृत्युची नोंद सोमवारी झाली नाही. शहरातील संशयित ४ हजार ६५१ जणांची चाचणी केली गेली. गेल्या काही िदवसांत प्रति िदवस सरासरी कोरोनाबाधित नवीन रुग्णांची संख्या ही शंभरच्या पुढे गेली होती.

    पुणे: शहरात गेल्या चोविस तासांत कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत ८० ने भर पडली अाहे. ७१ जणांनी कोरोनावर मात केली आहे. शहर आणि शहराबाहेरील एकाही रुग्णाच्या मृत्युची नोंद सोमवारी झाली नाही.
    शहरातील संशयित ४ हजार ६५१ जणांची चाचणी केली गेली. गेल्या काही िदवसांत प्रति िदवस सरासरी कोरोनाबाधित नवीन रुग्णांची संख्या ही शंभरच्या पुढे गेली होती. यामुळे सक्रीय रुग्णांची संख्या ९९० पर्यंत पोचली अाहे. त्यापैकी ७६ रुग्णांची प्रकृती गंभीर अाहे. आजपर्यंत शहरात एकुण ५लाख ९ हजार १०५ जणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यापैकी ४ लाख ९९ हजार १ जणांनी कोरोनावर मात केली. तर ९ हजार ११४ जणांचा मृत्यू झाला आहे.