तब्बल ९४ लाख लिटर दारू सहा महिन्यात तळीरामांचा घश्यात

मिळेल त्या दरात, मिळेल ती दारू मिळविण्यासाठी तळीरामांची भटकंती सूरू होती. अश्यात दारूबंदी उठविण्याचा निर्णय आघाडी सरकारने घेतला. या निर्णयाने तळीरामांचा आनंदाला सिमाच उरली नाही. अखेर ५ जूलैला परवानाप्राप्त दारू दुकानातून मद्याची विक्री सूरू आहे. सुरुवातीचा महिनाभर दारू दुकानासमोर लांब रांगा लागल्या होत्या. दारूबंदी उठून आज सहा महीणे पुर्ण झालेत.

    चंद्रपूर (Chandrapur) : चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठली आणि तळीरामांचा आनंदाला पारावर उरला नाही. या आनंदात अवघ्या सहा महिन्यात ९४ लाख ३४ हजार ४२ लिटर दारू तळीरामांनी पोटात रिचविली. ८६ दारू दुकान, २६४ विदेशी दारू दुकान, ८ वाईन शॉप, ३२ बियर शॉप आणि २ क्लबमधून विक्री झालेल्या दारूचा आकडा राज्य उत्पादन शुल्क विभागाने जाहीर केला आहे. हा आकडा थक्क करणारा आहेत. हा आकडा बघून आमच्या सारखे आम्हीच म्हणण्याची वेळ चंद्रपूरचा तळीरामांवर ओढावली आहे.

    तळीरामांचा आनंदाला सिमाच उरली नाही
    सन २०१५ मध्ये चंद्रपूरात दारूबंदी करण्यात आली. दारुबंदीने तळीरामांची मोठीच घालमेल झाली. मिळेल त्या दरात, मिळेल ती दारू मिळविण्यासाठी तळीरामांची भटकंती सूरू होती. अश्यात दारूबंदी उठविण्याचा निर्णय आघाडी सरकारने घेतला. या निर्णयाने तळीरामांचा आनंदाला सिमाच उरली नाही. अखेर ५ जूलैला परवानाप्राप्त दारू दुकानातून मद्याची विक्री सूरू आहे. सुरुवातीचा महिनाभर दारू दुकानासमोर लांब रांगा लागल्या होत्या. दारूबंदी उठून आज सहा महीणे पुर्ण झालेत.

    देशी दारूला मद्यप्रेमींची सर्वाधिक पसंती
    या सहा महिन्यात चंद्रपूरातील तळीरामांनी तब्बल ९४ लाख लिटर दारू घश्यात ओतली. विदेशी दारूपेक्षा देशी दारूला मद्यप्रेमींची सर्वाधिक पसंती मिळाली आहे. सहा महिन्यात तब्बल ६१ लाख ७५ हजार ५११ लिटर दारूचा खप झाला आहे. तर विदेशी दारू १६ लाख ५८ हजार ५४२ लिटर खप झाला. बिअरला मात्र सर्वाधिक कमी पसंत करण्यात आले. बिअरचा खप अवघा १५ लाख ६४ हजार ४० लिटर ऐवढा आहे. बिअरच्या तुलनेत वाईनचा खप मात्र वाढला आहे. ३७ हजार ४४९ लिटर वाईनचा खप आहे.