शाळेत जाण्यास नकार दिल्याने आईने मारली चापट, 9वीत शिकणाऱ्या मुलीला राग अनावर; रेल्वेसमोर उडी मारून केली आत्महत्या!

मथुरेमध्ये एका मुलीने शाळेत जाण्यास नकार दिला. मात्र, आईने तिला जबरदस्तीने शाळेत पाठवले. यामुळे संतापलेल्या मुलीने शाळेत जाण्याऐवजी रेल्वे रुळ गाठून रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या केली.

    आजकाल क्षुल्लक कारणावरुन वाद होऊन त्या वादाचा व्यक्तिच्या मनावर मोठा परिणाम होत असल्याचं दिसत आहे. यामुळे रागाच्या भरात नको ते पाऊल उचचलं जात. असाचं एक प्रकार उत्तर प्रदेशमधून समोर आला आहे.  आईने थप्पड मारल्याच्या रागातून एका १३ वर्षीय मुलीने ट्रेनसमोर उडी मारून आत्महत्या (9th Stranded Girl Suicide) केल्याची  धक्कादायक घटना मथुरा जिल्ह्यातून घडली आली आहे. ही मुलगी इयत्ता 9वीची विद्यार्थिनी होती.

    नेमकं काय घडलं?

    घटनेची माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, मथुरेमधील ओम नगर येथे राहणारा रामवीर शर्मा ऑटो चालवतो. त्यांना दोन मुली आणि एक मुलगा असून तो बारावीचा विद्यार्थी आहे. सर्वात लहान मुलगी सहावीत शिकते. तर मोठ्या मुलगी 13 वर्षाची असून नववीत शिकते. रामवीर शर्माच्या म्हणण्यानुसार, 4 डिसेंबरच्या रात्री त्यांच्या मुलीने तिच्या आईला मंगोडा बनवण्यास सांगितले, परंतु ती इतर कामात व्यस्त होती त्यामुळे तिने नकार दिला.

    मुलीने हट्ट केल्यावर आईने रागाच्या भरात तिला चापट मारली. याचा राग आल्याने मुलगी न जेवता झोपली. दुसऱ्या दिवशी त्याने शाळेत जाण्यास नकार दिला. यावर त्याच्या आईने त्याला शिवीगाळ केली, थापड मारली आणि जबरदस्तीने शाळेत पाठवले. यामुळे चिडलेल्या मुलीने शाळेत जाण्याऐवजी हायवे पोलीस स्टेशन हद्दीतील गणेशरा परिसरातील अलवर-मथुरा रेल्वे ट्रॅकवर पोहोचून ट्रेनसमोर उडी मारून आत्महत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी नोंद केली असून मृतदेहाचे पोस्टमार्टम करून कुटुंबीयांच्या ताब्यात दिला आहे.

    मात्र, घडलेल्या प्रकारामुळे परिसरात एकच खळळ उडली आहे. काही कारणमुळे पालक आपल्या मुलांना रागवतात. मात्र, मुलांना त्या गोष्टीचा राग येऊन ते रागाच्या भरात काय पाऊल उचलणार याची कल्पना कुणालाही नसते, त्यामुळे पालकांनी मुलांची योग्य ती काळजी घ्यायला हवी.