पोलिसांशी वाद घालणाऱ्यावर गुन्हा दाखल

एकजन दारू पित बसला होता. त्याला येथून निघून जा, असे सांगितले असता त्याने चिडून जात पुर्ण मार्केट माझ आहे. मी कुठेही बसेन तुम्हीच इथून जा अन्यथा तुमच्यावर फायरिंग करेन असे म्हणत गोंधळ घातला. यामुळे तक्रारदारांनी त्याला चौकीत घेऊन जाण्याचा प्रयत्न केल्यानंतर महिला व इतरांनी तक्रारदारांशी हुज्जत घालत त्याला घेऊन जाण्यास विरोधकरून सरकारी कामात अडथळा निर्माण केला.

    पुणे, मटन मार्केट माझ आहे, मी कुठेही बसेल अन दारू पिईल म्हणत पोलीसांशी वाद घालून सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याची घटना कसबा पेठेत घडली आहे. याप्रकरणी महिलांसह इतरांवर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार रविंद्र दहातोंडे यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, एका महिलेसह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे फरासखाना पोलीस ठाण्यात नेमणूकीस असून, त्यांना बीट मार्शल येथे कर्तव्य दिले आहे. रात्री बीट मार्शल असताना त्यांना फोनद्वारे माहिती मिळाली की, कसबा पेठेतील मटण मार्केट भागात काहीजन दारू पिऊन गोंधळ घालत आहेत. त्याचा त्रास सर्वांना होत असल्याचे समजले. त्यानुसार, तक्रारदार हे तेथे गेले. त्यावेळी एकजन दारू पित बसला होता. त्याला येथून निघून जा, असे सांगितले असता त्याने चिडून जात पुर्ण मार्केट माझ आहे. मी कुठेही बसेन तुम्हीच इथून जा अन्यथा तुमच्यावर फायरिंग करेन असे म्हणत गोंधळ घातला. यामुळे तक्रारदारांनी त्याला चौकीत घेऊन जाण्याचा प्रयत्न केल्यानंतर महिला व इतरांनी तक्रारदारांशी हुज्जत घालत त्याला घेऊन जाण्यास विरोधकरून सरकारी कामात अडथळा निर्माण केला. अधिक तपास फरासखाना पोलीस करत आहेत.