लग्नाचे आमिष दाखवून तरूणीशी गैरवर्तन करणाऱ्या तरुणासह कुटुंबावर गुन्हा

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीशी शारीरिक संबंध ठेवले व आरोपीच्या आई-वडिलांनीही लग्नाला नकार देत तिच्या जातीवरून तिला हिणवले (Pimpri Chinchwad Crime). यावरून हिंजवडी पोलीस ठाण्यात आरोपी तरुण व त्याच्या आई-वडिलांविरोधात सोमवारी (दि.१९) गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. हा प्रकार २२ मे २०२२ रोजी घडला आहे.

    पिंपरी : लग्नाचे आमिष दाखवून तरुणीशी शारीरिक संबंध ठेवले व आरोपीच्या आई-वडिलांनीही लग्नाला नकार देत तिच्या जातीवरून तिला हिणवले (Pimpri Chinchwad Crime). यावरून हिंजवडी पोलीस ठाण्यात आरोपी तरुण व त्याच्या आई-वडिलांविरोधात सोमवारी (दि.१९) गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. हा प्रकार २२ मे २०२२ रोजी घडला आहे.

    याप्रकरणी पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, ऋषिकेश चंद्रकांत इगवे (वय २४ रा.मूळ बीड), त्याचे वडील चंद्रकांत इगवे (वय ५०) व आई यांच्यावर गुन्ह दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तरुणीने फिर्यादीला  लग्नाचे आमिष दाखवून हिंजवडी इथे तिच्याशी शारीरिक संबध ठेवले. तसेच तिचे अक्षेपार्ह्य फोटो काढले. पीडितेनेलग्नाचा तगादा लावला असता आरोपीच्या आई-वडिलांनी लग्नाला नकार देत हाताने मारहाण करून जीतीवरून हिणवले. यावरून हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढिल तपास करत आहेत.