
160 किलो वजनाची एक महिला सकाळी अंथरुणातून उठण्याच्या प्रयत्नात खाली पडली. तिला उचलण्यासाठी कुटुंबीयांना महापालिकेची मदत घ्यावी लागली.
आपल्या आजुबाजुला अनेक विचित्र गोष्टी घडत असतात. ठाण्यातूनही सध्या अशीच एक विचित्र गोष्ट घडली आहे, ज्याची सोशल मीडियावर फार चर्चा होत आहे. 160 किलो वजनाची एक महिला सकाळी अंथरुणातून उठण्याच्या प्रयत्नात खाली पडली. तिला उचलण्यासाठी संपूर्ण कुटुंबाने प्रयत्न केले मात्र, तिला उचलता न आल्याने कुटुंबीयांना महापालिकेची मदत घ्यावी लागली. महिलेला वाचवण्यासाठी अग्निशमन दलाला पाचारण करावे लागल्याचे
नेमका प्रकार काय?
या प्रकरणी सविस्तर माहिती अशी की, गुरुवारी दुपारच्या सुमारास ठाण्यातील वाघबिल परिसरातील एक आजारी महिला तिच्या फ्लॅटमध्ये सकाळी 8 च्या सुमारास चुकून अंथरुणावरून पडली. गुरुवारी 160 किलो वजनाची एक बेडवरून पडली होती. त्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी त्याला उचलण्यासाठी अग्निशमन विभागाची मदत मागितली. 62 वर्षीय महिलेला तिच्या खराब प्रकृतीमुळे हालचाल करण्यास समस्येचा सामना करत आहे.
ठाणे महानगरपालिकेच्या (टीएमसी) अधिकाऱ्याने सांगितले की, महिलेच्या कुटुंबातील सदस्य तिला पुन्हा अंथरुणावर उतलून ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करत होते.मात्र, ते तिला उचलू शकत नव्हते. टीएमसीच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख यासिन तडवी यांच्या म्हणण्यानुसार, घाबरलेल्या कुटुंबीयांनी अग्निशमन अधिकाऱ्यांना मदतीसाठी बोलावले.
दरम्यान, प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे (आरडीएमसी) एक पथक फ्लॅटवर पोहोचले, त्यांनी महिलेला उचलले आणि तिला बेडवर बसवले. पडल्यामुळे महिलेला कोणतीही दुखापत झाली नसल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. जरी RDMC अनेक आपत्कालीन कॉलला प्रतिसाद देत असले तरी हे असामान्य होते, असे ते म्हणाले.