डोक्यावरून ट्रकचे चाक गेल्याने तरुणी जागीच ठार; शिरोली फाट्याजवळील घटना

दुचाकीवरून पडलेल्या युवतीच्या डोक्यावरून ट्रकचे चाक गेल्याने तिचा जागीच मृत्यू (Accident in Kolhapur) झाला. रोहिणी रमेश कांबळे (वय २०, रा. नागाव, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) असे तिचे नाव आहे.

    शिरोली / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : दुचाकीवरून पडलेल्या युवतीच्या डोक्यावरून ट्रकचे चाक गेल्याने तिचा जागीच मृत्यू (Accident in Kolhapur) झाला. रोहिणी रमेश कांबळे (वय २०, रा. नागाव, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) असे तिचे नाव आहे. पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर शिरोली फाटा येथे उड्डाणपुलावर शनिवारी रात्री सव्वा आठच्या सुमारास ही दुर्घटना घडली.

    याबाबत घटनास्थळी व पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, रोहिणी ही गांधीनगर येथे दुकानात नोकरी करते. सायंकाळी सात वाजता नेहमीप्रमाणे कामावरून सुटल्यानंतर ती व तिची मैत्रीण अशा दोघीजणी मित्राच्या दुचाकीवरून (एमएच ०९ इपी २०२८) नागाव फाटा येथे येत होत्या. शिरोली फाटा येथे महामार्गावर समोरील ट्रकला पाहून रोहिणीच्या मित्राने दुचाकीला ब्रेक लावला. यामध्ये रोहिणी दुचाकीवरून महामार्गावर पडली. काही कळण्याअगोदरच रोहिणीच्या डोक्यावरून भरधाव ट्रकचे चाक गेले. यामध्ये तिचा जागीच मृत्यू झाला.