‘होगी प्यार की जीत!’ लग्नाला नकार देणाऱ्या प्रियकराचा होकार मिळवण्यासाठी प्रेयसीने केलं ‘असं काही’, झालं ना शेवटी लग्न

दोघेही एकमेकांच्या घरी जायचे. दोन्ही कुटुंबांमध्ये लग्नाबाबत करारही झाला आणि लग्नाची तारीखही निश्चित झाली. पण लग्नाच्या 20 दिवस आधी उत्तमने माघार घेतली. असा दावा तरुणीने केला आहे.

  प्रेमी युगल लग्न व्हाव म्हणून धडपड करतात. कुटुंबियांना लग्नासाठी तयार करतात. एव्हडं सगळ केल्यावर  लग्नाची तारीखही काढण्यात येते पण मुलगा लग्नासाठी नकार देतो. त्यानतरं मुलगी लग्नासाठी मुलाच्या घरासमोर आंदोलनाला बसली. तब्बल  80 तासांच्या आंदोलनानंतर मुलगा लग्नासाठी तयार होतो आणि त्यांच अखेर लग्न होतं. ही कथा जरी सिनेमासारखी वाटत असली तरी ते प्रत्यक्षात घडलयं झारखंडमधे. कडाक्याच्या थंडीत तब्बल 80 तास रस्त्यावर धरणे धरून बसलेल्या तरुणीची मागणी अखेर पूर्ण करण्यात आली आहे. चार वर्षांच्या प्रेमानंतर अखेरच्या क्षणी प्रियकराने लग्नास नकार दिला. मुलीचा नंबरही ब्लॉक होता. यावर त्या व्यक्तीच्या मैत्रिणीने घराबाहेर ठिय्या आंदोलन केले होते.

  चार वर्षांपासून सुरु होतं प्रेम प्रकरण

  निशा असे धरणावर बसलेल्या मुलीचे नाव आहे. वय 20 वर्षे. ती पूर्व वसुरिया येथील रहिवासी आहे. निशा सांगते की, चार वर्षांपूर्वी तिची महेशपूर येथील रहिवासी उत्तम पटेल यांच्याशी भेट झाली. त्यानंतर निशा एसएसएलएनटी कॉलेजमध्ये शिकायची. दोघेही कॉलेजजवळ भेटले आणि हळूहळू प्रेमात पडले. आयुष्यभर एकत्र राहून लग्न करण्याचे आश्वासनही दिले होते.

  लग्नाच्या 20 दिवस आधी नकार

  दोघांच्या घरच्यांना या नात्याची माहिती होती, असे निशा म्हणाली. दोघेही एकमेकांच्या घरी जायचे. दोन्ही कुटुंबांमध्ये लग्नाबाबत करारही झाला आणि लग्नाची तारीखही निश्चित झाली. पण लग्नाच्या 20 दिवस आधी उत्तमने माघार घेतली. असा दावा निशा यांनी केला आहे. 

  पोलिसात गुन्हा दाखल

  निशाच्या म्हणण्यानुसार, उत्तमने तिचा नंबरही ब्लॉक केला होता. कोणताही मार्ग न सापडल्याने निशा तिच्या आजी आणि इतर नातेवाईकांसह उत्तमच्या घराबाहेर धरणे धरून बसली. यादरम्यान उत्तम आणि त्याचे कुटुंबीय घरातून पळून गेल्याचे वृत्त आहे. अखेर निशाच्या वडिलांनी राजगंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यानंतर मुलाच्या घरच्यांनी बोलून पुन्हा लग्नाला होकार दिला. मंदिरात दोन्ही कुटुंबीयांच्या उपस्थितीत पूर्ण विधीपूर्वक हा विवाह पार पडला. निशाने आज तकला सांगितले की, ती लग्नामुळे खूप खूश आहे. त्या मुलाविरुद्ध पोलिस ठाण्यात दाखल केलेली तक्रारही मागे घेणार असल्याचे निशाने सांगितले.