Rape of a young woman with the lure of marriage

  पुणे : मुंढवा भागातील एका उच्चशिक्षित तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार करून तिचा मानसिक छळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तरुणीला पळून न जाण्याची धमकी देत पळून गेल्यास तुझ्या श्वानांना गॅलरीतून बाहेर फेकून देण्याची धमकी दिली. तर, तिचा लॅपटॉप काढून घेऊन तिला घरात पाच दिवस डांबून ठेवल्याचेदेखील तक्रारीत म्हटले आहे. पोलिसांनी तरुणावर गुन्हा नोंद केला आहे.

  याप्रकरणी संग्राम कोरेकर (वय ३५, रा. ईस्ट ऊड्स क्लोवर मॉलसमोर, कोंढवा) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत २८ वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. हा प्रकार मे ते डिसेंबर २०२३ या कालावधीत घडला आहे.

  पीडित मुलगी लंडनमध्ये करीत होती नोकरी

  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार मुलगी मुंढवा परिसरात राहते. तर, आरोपी कोंढव्यात राहण्यास आहे. दोघांचेही यापूर्वी विवाह झालेले असून, त्यांचे घटस्फोट झालेले आहेत. दरम्यान, त्यांची नोव्हेंबर २०२२ मध्ये ओळख झाली होती. एका कॉमन मैत्रिणीच्या माध्यमातून ही ओळख झाली होती. पीडित मुलगी लंडनमध्ये नोकरी करीत होती. सध्या ती बहिण व आईसोबत मुंढव्यात राहत आहे. तिला श्वानांची खूप आवड आहे. त्यामुळे तिने श्वान पाळले आहेत.

  पीडिता आणि तरुण एकत्रित राहायला

  दरम्यान, दोघांची ओळख झाल्यानंतर ते एकत्रित लिव्हइनमध्ये राहत होते. दोघांच्या कुटुंबियांनी त्यांच्याबाबत माहिती होती. दरम्यान, मुलाच्या कुटुंबियांनी तिला श्वान घरी पाळण्याबाबत नकार दिला होता. तेव्हापासून त्यांच्यात वादावादी सुरू झाली होती. दरम्यान, मुलीने संग्राम तिला मारहाण करीत होता. मानसिक त्रास देत होता. तर तो श्वानांना गॅलरीतून टाकील अशी धमकी देत होता, असे तक्रारीत म्हटले आहे. त्यासोबतच त्याने घरात डांबून (कोंडून) ठेवले असल्याचेही म्हटले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.