suicide

आपला स्वतःचा व्यवसाय वाढावा म्हणून कर्जावर ट्रॅक्टर खरेदी केले. मात्र, आवक होण्यापेक्षा त्या ट्रॅक्टरचे हप्तेच अधिक होते. बँकेचे कर्मचारी तगादा लावत होते. अखेर कर्जाला कंटाळून आत्महत्या (Man Suicide in Gondia) केल्याची घटना गोरेगाव येथील जुन्या वस्तीत 20 नोव्हेंबर रोजी घडली.

    गोंदिया : आपला स्वतःचा व्यवसाय वाढावा म्हणून कर्जावर ट्रॅक्टर खरेदी केले. मात्र, आवक होण्यापेक्षा त्या ट्रॅक्टरचे हप्तेच अधिक होते. बँकेचे कर्मचारी तगादा लावत होते. अखेर कर्जाला कंटाळून आत्महत्या (Man Suicide in Gondia) केल्याची घटना गोरेगाव येथील जुन्या वस्तीत सोमवारी (दि.20) घडली. चैतराम सोमा पटले (वय 60) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

    शेती परवडणारी नाही. त्यामुळे शेतीला जोडधंदा आणि कुटुंबाचे चांगले पालनपोषण होईल, या अपेक्षेने गोरेगाव शहरातील जुनी वस्ती येथील चैतराम सोमा पटले यांनी ट्रॅक्टर खरेदी केला. त्या ट्रॅक्टरचे हप्ते बांधले. मात्र, वेळेत हप्ते फेडता आले नाही. आवक होण्यापेक्षा जावकच जास्त होत होती. परिणामी, कर्ज अंगावर चढले. कर्जाच्या रकमेची परतफेड करण्यासाठी बँकेचे कर्मचारी वारंवार तगादा लावत होते.

    अखेर याला कंटाळून 20 नोव्हेंबर रोजी बकऱ्यांकरिता चारा आणतो म्हणून चैतराम पटले घराबाहेर पडले. त्यांनी कर्ज असह्य झाल्याने गोरेगाव शहराबाहेर असलेल्या भाऊलाल अगडे यांच्या शेतातील पळसाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. कुवरलाल चैतराम पटले (वय 36) यांच्या तक्रारीवरून गोरेगाव पोलिसांनी आकस्मिक मृत्युची नोंद केली. तपास पोलिस हवालदार ज्ञानेश्वर औरासे करत आहेत.