दुर्गापूजेसाठी तरुण शेतातून घरी परत आला, मन भरून मडंपात नाचला, नाचता नाचता पडून मृत्यू!

मृत मुलायमच्या वडीलांनी सांगितले की, त्यांता मुलगा शेतात सिंचनासाठी गेला होता. तिथून परत आल्यानंतर समोरचा दुर्गापूजा मंडपात गेला. तिथे तो नाचता नाचत खाली पडला.

    गेल्या काही दिवसात गुजरातमध्ये गरबा खेळताना 10 ते 12 जणांनी त्यांचा जीव गमावला. यामुळे प्रशासनसह तरुणांची चिंता वाढली आहे. असं असंताना आता उत्तर प्रदेशच्या आंबेडकर नगरमध्ये दुर्गापूजेच्या कार्यक्रमादरम्यान नाचत असताना एक तरुण बेशुद्ध होऊन जमिनीवर पडला. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या तरुणाला हृदयविकाराचा झटका आल्याचा संशय वर्तविण्यात येत आहे. त्याच्या आकस्मिक मृत्यूने कुटुंबियाना धक्का बसला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, उत्तरप्रदेशमधील अकबरपूरच्या लोरपूर परिसरात ही घटना घडलीआहे. 20 ऑक्टोबर रोजी 32 वर्षीय मुलायम राजभर दुर्गा पूजा मंडालजवळ नाचत असताना अचानक कोसळला. लोकांनी त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात नेले. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच मुलायम यांचा मृत्यू झाला होता. हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच तरुणाचा मृत्यू झाला होता, असे त्यांचे म्हणणे आहे.

    मृतकाला कोणताही आजार नव्हता

    मुलायम राजभर यांचे वडील सांगतात की तो अविवाहित होते. त्याला कोणत्याही प्रकारचा आजार नव्हता. घटनेच्या दिवशी सायंकाळी ते शेतात काम करून परतले होते. त्यानंतर काही वेळाने तो दुर्गा मंडपात पोहोचला, तिथे मित्रांसोबत डान्स करताना तो अचानक जमिनीवर पडला. आता या घटनेच्या तीन दिवसांनंतर त्याचा व्हिडिओ समोर आला आहे.

    मृत मुलायम राजभर यांचे वडील धर्मराज म्हणाले – मुलगा शेतात सिंचन करण्यासाठी गेला होता. तिथून परत आल्यानंतर समोरचा दुर्गापूजा मंडपात निघून गेला. तिथे अजून चार-पाच मुलं होती. त्याच्यासोबत मुलगाही नाचत होता. नाचताना खाली पडला. त्याला डॉक्टरांकडे नेले पण तोपर्यंत फार उशीर झाला होता.