‘माझ्या कुत्र्याला कुत्रा कसा म्हण्टलं’; भडकलेल्या मालकाने घेतला शेतकऱ्याचा जीव, रोजच्या भांडणाचा दुर्देवी अतं

मृत रायप्पन थडीकोम्बू हा शेतकरी होता. त्याचे शेजारी डॅनियल आणि व्हिन्सेंट यांच्याशी त्यांच्या कुत्र्यांवरून अनेकदा वाद होत होते.

  पाळीव प्राण्यांवरुन शेजाऱ्यांमध्ये होणारी भाडंण काही नवीन नाही. कधी कधी ही भाडणं तीव्र स्वरुपाची होतात आणि अनेकदा पोलीस ठाण्यापर्यंत जाऊन पोहोचतात. मात्र, तामिळनाडूमधील (Tamilnadu) या प्रकरणात काहीतरी भलतचं झालयं. तामिळनाडूमध्ये शेजारच्या कुत्र्याला ‘कुत्रा’ (Dog) म्हणणे शेतकऱ्याला (Farmer) चांगलेच महागात पडले. एवढ्या किरकोळ गोष्टीसाठी शेजाऱ्यांनी शेतकऱ्याची हत्या केली. शेतकऱ्याची त्याच्या कुत्र्यावरून शेजाऱ्यांशी रोज भांडणे व्हायची. मात्र, यावेळी तो त्याच्या कुत्र्याला ‘कुत्रा’ म्हणू लागला तेव्हा भांडण वाढले आणि मालकाने थेट शेतकऱ्याची हत्या केली.

  नेमकं काय झालं?

  तामिळनाडूतील दिंडीगुल येथील थडीकोम्बू गावात ही विचित्र घटना घडली आहे. येथे एका शेतकऱ्याला त्याच्या शेजाऱ्यांनी मृत रायप्पन थडीकोम्बू हा शेतकरी होता. त्याचे शेजारी डॅनियल आणि व्हिन्सेंट यांच्याशी त्यांच्या कुत्र्यांवरून अनेकदा वाद होत होते. ते त्यांचे नातेवाईकही होते. रायप्पन त्याला सांगायचा की त्याचा कुत्रा खूप आक्रमक आहे. ते वाटेत लोकांचे नुकसान करतात. तो नेहमी कुत्र्याला बांधायला सांगतो. तरीही शेजारी कुत्र्यांना मोकळे सोडायचे.

  या कुत्र्याने अनेकांना चावा घेतल्याचे सांगण्यात येत आहे. रायप्पनलाही त्याच्या कुत्र्याने अनेकदा चावा घेतला होता. यामुळे शेजाऱ्यांवर त्याचा राग होता. याबाबत त्यांनी अनेकदा त्यांच्याकडे तक्रार केली. तरीही त्याने कुत्र्याला बांधायला सुरुवात केली नाही तेव्हा रायप्पनने त्याच्या कुत्र्याला नावाने हाक मारण्याऐवजी त्याला ‘कुत्रा’ म्हणायला सुरुवात केली.

  यामुळे शेजारी संतप्त झाले. रविवारी रायप्पन तेथून जात असताना. त्यानंतर त्याने शेजाऱ्याच्या कुत्र्याला ‘कुत्रा’ म्हटले. त्यामुळे शेजारी संतापले. या प्रकरणावरून त्याचा रायप्पनशी वाद सुरू झाला. आधीच संतापलेल्या मालकाने त्याला  शेजारी म्हणाले, तुम्ही आमच्या कुत्र्याला असा ‘कुत्रा’ कसा म्हणलात? असं म्हण्टलं.  त्याचं नाव आहे, त्याला नावाने हाक मारा असं म्हण्टलं.  त्यावर रायप्पन म्हणाला की मी त्याला फक्त ‘कुत्रा’ म्हणेन. त्यानंतर या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले.

  धक्काबुक्कीत गेला जीव

  रायप्पनने शेजारून एक काठी उचलली आणि कुत्र्याला मारण्याचा प्रयत्न सुरू केला. मग डॅनियल आणि व्हिन्सेंटने त्याला ढकलले. धक्का लागल्याने तो खाली पडला. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. सध्या पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.