दुर्दैवी ! अंगावर ट्रॅक गेल्याने ७ वर्षीय बालिका ठार  

चोराडे ता. खटाव येथे ऊसाच्या फडामध्ये अंगावर ट्रक गेल्याने सात वर्षीय बालिका गंभीर जखमी झाली. या अपघातात ती जागीच ठार झाल्याची घटना घडली. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, याप्रकरणी औंध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

    वडूज : चोराडे ता. खटाव येथे ऊसाच्या फडामध्ये अंगावर ट्रक गेल्याने सात वर्षीय बालिका गंभीर जखमी झाली. या अपघातात ती जागीच ठार झाल्याची घटना घडली. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, याप्रकरणी औंध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

    चोराडे येथील गाउंधर नावाच्या शिवारातील पांडुरंग निवृत्ती घुटुगडे यांच्या शेतात ऊसतोडणी सुरु होती. मंगळवारी दुपारी ट्रकचालक दत्तात्रय अस्राजी भवर (रा. कोहिनी, ता. आष्टी, जि. बीड) हा शेतात तोडलेला ऊस भरुन घेऊन जाण्यासाठी गेला होता. त्यावेळी तो ट्रक पाठीमागे घेत असतानाच या बालिकेच्या अंगावरून ट्रकचे डाव्या बाजूचे चाक अंगावर गेले. त्यात ती गंभीर जखमी झाली.

    दरम्यान, याबाबतची फिर्याद अजिनाथ विश्वनाथ गायकवाड (वय ४०, मूळ रा. मेखरी ता. आष्टी जि.बीड, सध्या रा. चोराडे ता.खटाव जि.सातारा) यांनी औंध पोलिस ठाण्यात दिली. या घटनेचा पुढील तपास पोलिस हवालदार आर. एस. वाघ करत आहेत.