धक्कादायक ! मुलांच्या छेडछाडीला कंटाळून किशोरवयीन मुलीची आत्महत्या

आठवी इयत्तेत शिकणाऱ्या मुलीने आत्महत्या केल्याने परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

    बीड – बीडमध्ये धक्कादायक घटना समोर आली आहे. छेडछाडीला कंटाळून आठवीच्या वर्गात शिकणाऱ्या मुलीने टोकाचे पाऊल उचलले. मुलांच्या छेडछाडीला कंटाळून किशोरवयीन मुलीने आत्महत्या केली. आठवी इयत्तेत शिकणाऱ्या मुलीने आत्महत्या केल्याने परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. आपल्या मुलींने टोकाचं पाऊल उचलल्याने कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

    आठवीच्या वर्गात शिकत असलेल्या एका अल्पवयीन शाळकरी मुलीने छेडछाडीला कंटाळून आत्महत्या केल्याचा प्रकार बीडमध्ये घडला आहे. केजच्या औरंगपूर येथे ही धक्कादायक घटना समोर आली आहे. औरंगपूर येथील मुलगी आठवीच्या वर्गात शिक्षण घेत होती. मागील अनेक दिवसांपासून दोन मुले पीडित मुलीला त्रास देत होती. शाळेतून येता-जाता ही मुले पीडित मुलीला वारंवार त्रास देत होती.  दोन मुलांकडून वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून अखेर शाळकरी मुलीने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करत टोकाचं पाऊल उचललं आहे. याप्रकरणी मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून युसुफ वडगाव पोलिसात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    राहुल शिंदे आणि सोमनाथ डिवरे असे गुन्हा दाखल झालेल्या मुलांची नावं आहेत. यापूर्वी देखील या मुलांना समज देण्यात आली होती. मात्र तरीही त्यांनी या मुलीला त्रास दिला तर आमच्या गाडीवर बसली नाही तर परीक्षा देऊ देणार नाही, अशा धमक्या या दोघांनी या मुलीला दिल्या होत्या आणि त्यांच्याच त्रासाला कंटाळून मुलीने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली.