शिंदखेड्यातील एटीएम फोडीप्रकरणातील आरोपींना अटक; धुळे पोलिसांची कामगिरी

  धुळे : शिंदखेड्यातील स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम मशिन कटरच्या सहाय्याने कापून ३६ लाखांची रोख रक्कम चोरून नेली होती. या प्रकरणाचा तपास करण्यास धुळे पोलिस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेला यश आले.

  धुळे एलसीबीने थेट हरयाणा येथे जाऊन तपास करीत या टोळीच्या मुसक्या आवळल्या. हरीयाणा आणि मध्यप्रदेशातून ४ जणांना अटक करीत ८ लाख ६० हजारांचा मुद्देमाल सुध्दा हस्तगत केला आहे.

  या कामगिरीबाबत आज पोलिस अधिक्षक प्रविणकुमार पाटील यांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली. १४ नोव्हेंबरला शिंदखेडा शहरातील स्टेट बँक शाखेसमोरील एटीएम मशिन फोडण्यात आले होते. चोरांनी एटीएम सेंटरमधील सीसीटीव्ही कॅमेर्‍यांवर काळा रंगाचा स्प्रे मारला आणि कनेक्शन कट केले.

  गॅस कटरच्या सहाय्याने मशिन कट करुन त्यातून ३६ लाख ८६ हजार ५०० रुपयांची रोख रक्कम काढून पोबारा केला होता. या गुन्हयासाठी पिकअप वाहन वापरण्यात आले होते. तब्बल ३६ तासानंतर ही चोरी झाल्याचे लक्षात आले. तोपर्यंत चोरटे पसार झाले होते. या गुन्ह्याची गांभिर्य लक्षात घेवून पोलिस अधिक्षक प्रविणकुमार पाटील यांनी अपर पोलिस अधिक्षक प्रशांत बच्छाव व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांना तपासाच्या सुचना दिल्या होत्या. शिंदखेडा येथे जावून पथकाने तपास सुरु केला.

  एलसीबीने सर्वात आधी शिंदखेड्यात काही महत्वाचे सीसीटीव्ही फुटेज गोळा केले, त्यात पांढर्‍या रंगाची पिकअप वाहन वापरल्याचे स्पष्ट झाले. आरोपी नेवाली-खेतीया-शहादा-दोंडाईचा-शिंदखेडा या मार्गाने येवून पुन्हा करुन त्याच मार्गाने पळून गेल्याचे निदर्शनास आल्याने ही एटीएम लुट हरीयाणा येथील टोळीने केल्याची पक्की खात्री एलसीबी पथकाची झाली. त्याअनुंषागाने तपास सुरु करण्यात आला.

  हरीयाणा राज्यातील पलवल आणि नुहू या शहरांमध्ये एलसी निदर्शनास आल्याने ही एटीएम लुट हरीयाणा येथील टोळीने केल्याची पक्की खात्री एलसीबी पथकाची झाली. त्याअनुंषागाने तपास सुरु करण्यात आला. हरीयाणा राज्यातील पलवल आणि नुहू या शहरांमध्ये एलसीबी पथक रवाना करण्यात आले. पथकाने हरीयाणा पोलिसांच्या मदतीने प्रमुख संशयीत आबिद उर्फ लंगडा उर्फ बकरा अब्दुल अही (वय-४५ रा.ग्राम ओहोता, ता.पुन्हाना जि.नुहू) व माहिर लियाकत अली (वय-२०, रा.ग्राम घोडावली, ता.हथिन जि.पलवल हरियाणा) या दोघांना ताब्यात घेवून विचारपूस केली. त्यात त्यांनी इतर ५ साथीदारांच्या मदतीने शिंदखेड्यात एटीएम मशिन कटरने कापून चोरी केल्याचे सांगितले.