नागपूरात चौकीदाराचा मृत्य, रात्री पेटवलेली शेकोटी जीवावर बेतल्याचा संशय

रवींद्र काळबांडे असं या चौकीदाराचं नाव आहे. कळमेश्वर मार्गावर गोरेवाडा वनक्षेत्रात रात्र पाळीतील रवींद्र कामावर होते. थंडीचे दिवस असल्यानं त्यांनी चौकीच्या आत शेकोटी पेटविली. त्या शेकोटीजवळच त्यांचा मृतदेह सापडला. चौकीच्या आतील साहित्यही जळालेले आहे. रविवारी सकाळी ही घटना उघडकीस आली.

  नागपूर (Nagpur) : थंडीपासून संरक्षण मिळावे म्हणून शहरवासी ठिकठिकाणी शेकोड्या पेटवितात. शेकोटी पेटवून जवळ असलेल्या एका चौकादाराचा मृतदेह रविवारी सकाळी सापडला. या चौकीदाराचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत सापडला. त्यामुळं त्यांचा मृत्यू कसा झाला हे गूढ अद्याप कायम आहे.

  चौकीच्या आतील साहित्यही जळाले
  रवींद्र काळबांडे असं या चौकीदाराचं नाव आहे. कळमेश्वर मार्गावर गोरेवाडा वनक्षेत्रात रात्र पाळीतील रवींद्र कामावर होते. थंडीचे दिवस असल्यानं त्यांनी चौकीच्या आत शेकोटी पेटविली. त्या शेकोटीजवळच त्यांचा मृतदेह सापडला. चौकीच्या आतील साहित्यही जळालेले आहे. रविवारी सकाळी ही घटना उघडकीस आली.

  मृत्यू नेमका कशामुळं
  रवींद्र काळबांडे यांचा मृत्यू हा नेमका कशामुळं झाला हे अद्याप स्पष्ट सांगता येत नाही. पण, शेकोटीच्या धुरामुळे गुदमरून त्यांचा जीव गेला असावा. किंवा भाजून त्यांचा मृत्यू झाला असावा, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. थंडी असल्यामुळं शक्य होईल, ते लोकं शेकोटी पेटवितात. तिचा सहारा घेतात.

  अशी घडली घटना
  चौकीदार काळबांडे हे चौकीदारी करतात. संध्याकाळी त्यांनी थंडीपासून संरक्षण मिळावे म्हणून शेकोटी पेटविली. शिवाय शॉलही गुंडाळली होती. परंतु, ते झोपेत असताना शॉलनं पेट घेतला असावा. त्यामुळं ती आग त्यांच्यापर्यंत पोहचली असावी. त्यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असावा, अशी शंका व्यक्त केली जात आहे.