घर साफ करण्यावरून पतीपत्नेमध्ये भांडण, राग अनावर झाल्यानं पत्नीने कापला पतीचा कान!

पती-पत्नीमधे घरा साफसफाईवरुन वाद झाला. हा वाद इतका वाढला की, पत्नीने पतीच्या कानाचा चावा घेतला. यानंतर त्या व्यक्तीच्या कानावर शस्त्रक्रिया करावी लागली.

  नवी दिल्ली: आजकाल क्षुल्लक कारणावरुन पतीपतीमध्ये भांडण होऊन नात्यात वितुष्ट येतंं. अनेकदा हे भांडण वाढत जाऊन त्याच पर्यवसन मारहाणीत होतं. कधी यातुन गंभीर गुन्हाही घडतो. दिल्लीतील सुलतानपुरी येथून अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे पतीपत्नीमध्ये क्षुल्लक कारणावरुन झालेल्या भांडणानंतर पत्नीने रागाच्या भरात पतीच्या कानाचा चावा (Wife bites Husvand Ear) घेतल्यामुळे त्याच्या उजव्या कानाचा वरचा भागच वेगळा झाला. यानंतर पीडितेच्या पतीवर शस्त्रक्रिया करावी लागली. उपचारानंतर पतीने पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

  नेमकं काय घडलं

  पोलिसांनी महिलेच्या पतीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

  मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीतील सुलतानपुरी परिसरात राहणाऱ्या पतीमध्ये 20 नोव्हेंबरला घरात साफसफाई करण्यावरुन  भांडण झालं. पती सकाळी घराबाहेर कचरा टाकण्यासाठी गेला होता. तिने त्याला घर साफ करण्यास सांगितले. मात्र त्यानं नकार दिल्यामुळे दोघांमध्ये कडाक्याचं भांडण सुरू झालं. यादरम्यान तिने त्याला त्याचे घर विकून तिला तिचा हिस्सा देण्यास सांगितले जेणेकरून ती आपल्या मुलांसोबत वेगळी राहू शकेल. पतीने पोलिसांना सांगितले की, त्याने पत्नीची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र पत्नी सतत वाद घालत राहिली. यावरुन आणखी वाद वाढला आणि तिने रागाच्या भरात त्याच्या कानाचा चावा घेतल.

   

  पतिच्या म्हणण्यानुसार, भाडंणादरम्यान त्याच्या पत्नीने त्याला मारण्याचा प्रयत्न केला. पण त्याने तिला दूर ढकलले. यानंतर तो घराबाहेर पडू लागला असता त्याच्या पत्नीने त्याला मागून पकडून त्याच्या कानाच्या वरच्या भागात चावा घेतला. त्यानंतर त्याचा मुलगा त्याला मंगोलपुरी येथील रुग्णालयात उपचारासाठी घेऊन गेला. रुग्णालयात त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली.

  पोलिसांनी सांगितले की, 20 नोव्हेंबर रोजी त्यांना हॉस्पिटलमधून हल्ल्याची माहिती मिळाली होती आणि त्यानंतर एक टीमही गेली होती. मात्र पीडित महिला त्यावेळी म्हणण्याच्या मनस्थितीत नव्हती. आपले म्हणणे देण्यासाठी पोलीस ठाण्यात येणार असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. यानंतर 22 नोव्हेंबर रोजी त्यांनी पोलिसांशी संपर्क साधून लेखी तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.