मुलगा विहिरीत पडताना वडिलांनी पाहिले, पण अखेर…

राहुरी तालुक्यातील (Incident in Rahuri) कणगर येथे विहिरीत पडून तरुणाचा मृत्यू (Man Died after Falling into a Well) झाला. भारत बाळासाहेब वाघुंडे (वय २४, रा. वरघुडे वस्ती) असे मृत तरूणाचे नाव आहे.

    राहुरी / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : राहुरी तालुक्यातील (Incident in Rahuri) कणगर येथे विहिरीत पडून तरुणाचा मृत्यू (Man Died after Falling into a Well) झाला. भारत बाळासाहेब वाघुंडे (वय २४, रा. वरघुडे वस्ती) असे मृत तरूणाचे नाव आहे. गेल्या दोन वर्षांपासून चांगला पाऊस झाल्याने विहिरी काठोकाठ भरल्या आहेत.

    भारत सोमवारी सकाळी आठच्या सुमारास विहिरीत पडला. त्याला पडताना वडिलांनी पाहिले. त्यानंतर मदतीसाठी आरडाओरड केली. सरपंच सर्जेराव घाडगे व पोलिस पाटील बाळासाहेब मुसमाडे यांनी ग्राम सुरक्षा यंत्रणावर फोन करून मदतीची हाक दिली. काही वेळातच सोशल मीडियावर मदतीसाठी आवाहन व्हायरल झाले.

    पट्टीचे पोहणारे सुभाष वराळे, अनिल बर्डे यांच्यासह दोघांनी भारतचा विहिरीत शोध घेण्याचा प्रयत्न केला. तहसीलदार फैसियोद्दीन शेख यांनी आपत्कालीन व्यवस्थापन टीम मदतीसाठी धाडली. मात्र, तीन तासांनी भारतचा मृतदेह गळाला लागला. पोटात पाणी गेल्याने तो मृत झाला. राहुरी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यू नोंद करण्यात आली आहे.