Shocking! Wife stoned to death in Pune; Suicide of husband; Murder at the behest of Savat and the girl

घोटीतील पचितराय बाबानगर येथील रेल्वे लाईनच्या बाजूला एका युवकाचा खून करण्यात आला. याबाबत घोटी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. गुरुवारी (दि. २५) सकाळी स्थानिकांनी परिसरात खून झाल्याचे पोलीस ठाण्यात कळविले.

    इगतपुरी : घोटीतील पचितराय बाबानगर येथील रेल्वे लाईनच्या बाजूला एका युवकाचा खून करण्यात आला. याबाबत घोटी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. गुरुवारी (दि. २५) सकाळी स्थानिकांनी परिसरात खून झाल्याचे पोलीस ठाण्यात कळविले. त्यानंतर तत्काळ पोलिस निरीक्षक विनोद पाटील पथकासह घटनास्थळी पोहचत पंचनामा करून सदरचा मृतदेह घोटी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.

    युवकाच्या डोक्यात व चेहऱ्यावर वजनदार दगड टाकून ओळख लपविण्यासाठी आरोपीने प्रयत्न केल्याचे दिसून आले. सदर घटना गंभीर असल्याने पाटील यांनी आपल्या खास पथकातील कर्मचाऱ्यांना आरोपीच्या मागावर धाडले आहे. लवकरच आरोपी जेरबंद होतील असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

    चेहऱ्यावर दगडाने आघात करत ओळख पुसण्याचा प्रयत्न आरोपीने केला. मात्र, पोलिसांनी तात्काळ स्थानिक गुन्हे शाखा व वरिष्ठ पातळीवर हालचाली सुरु ठेवल्याने लवकरच यश येईल, असे सांगितले जात आहे. मृत तरुणाच्या अंगावर काळे जॅकेट व काळी जीन्स पँट घातलेली असून, उजव्या हातावर जय भीम नाव गोंदलेले आहे.