आमिर खानची मुलगी इराला बॉयफ्रेंडने फिल्मी स्टाईलमध्ये केलं प्रपोज, चाहत्यासंह सेलिब्रिटींचीही व्हिडिओला पसंती

इरा आणि नुपूर खूप दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. इरा अनेकदा नुपूरसोबतचे तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. नुपूर अनेकदा कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये इरासोबत दिसली. त्याचबरोबर इरा आणि नुपूर आमिर खानसोबत अनेकदा दिसले आहेत.

  बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानची (Aamir Khan)  मुलगी इरा खान (Ira Khan) सोशल मिडियावर काही ना काही कारणाने कायम चर्चेत असते. इरा सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि नेहमी ती तिचे फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते. तसेच इरा तिच्या पर्सनल लाईफमुळेही अनेकदा चर्चेत असते. इराने नुकताच बॉयफ्रेंड नुपूर शिखारे सोबतचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओला चाहत्यांचीही खूप पंसती मिळत आहे.

  इरा आणि तिचा बॉयफ्रेंड नुपूर शिखारेसोबत हा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलात व्हायरल होत आहे. नूपुरने एका कार्यक्रमा दरम्यान इराला अतिशय रोमँटिक स्टाईलमध्ये प्रपोज केले आहे. हा व्हिडिओ तीने तीच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. नुपूर इराला गुडघ्यावर बसून फिल्मी पद्धतीने प्रपोज करतो दिसतोय. तर इराही होकार देताना दिसतेय यानंतर तो तिला अंगठी घालतो.

  इरा आणि नुपूरचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. इराचा हा व्हिडीओ पाहून तिचे चाहतेच नाही तर सेलिब्रिटीही तिचे अभिनंदन करत आहेत. फातिमा सना शेखने लिहिले, ‘मी आजवर पाहिलेली ही सर्वात सुंदर गोष्ट आहे, नुपूर कितनी फिल्मी हो.’ याशिवाय कृष्णा श्रॉफने लिहिले, ‘सर्वात सुंदर गोष्ट.’

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Ira Khan (@khan.ira)

  इरा खानचा बॉयफ्रेंड नुपूर हा एक फिटनेस कोच आहे. इरा आणि नुपूर खूप दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. इरा अनेकदा नुपूरसोबतचे तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. नुपूर अनेकदा कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये इरासोबत दिसली. त्याचबरोबर इरा आणि नुपूर आमिर खानसोबत अनेकदा दिसल्या आहेत.