अभिजीत बिचुकले लढवणार राष्ट्रपतीपदाची निवडणूक, पाठिंब्यासाठी आमदार खासदारांच्या संपर्कात

आपण राष्ट्रपती पदासाठी इच्छुक (Abhijeet Bichukale to contest president election) असून, काही आमदार-खासदारांशी संपर्कात (MLA And MP contact) आहोत, तसेच पाठिंब्यासाठी त्यांच्या गाठी भेटी घेत आहोत, असं सांगत बिचुकलेंनी सांगितले आहे. मी सध्या पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातल्या (Bangal, UP and Maharashtra) काही आमदार- खासदारांशी सह्यांसंदर्भात संपर्कात आहे.

    मुंबई : निवडणूक आयोगाने (Election commission) देशाच्या नव्या राष्ट्रपतींच्या निवडणुकीचा (presidential election 2022) कार्यक्रम जाहीर केला आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ramnath Kovind) यांचा कार्यकाळ 24 जुलै रोजी संपणार आहे. त्यामुळं 18 जुलै रोजी राष्ट्रपतींची निवडणूक होणार आहे. तर, राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवार 29 जूनपर्यंत अर्ज भरता येणार आहे. 30 जून रोजी उमेदवारी अर्जांची छाननी होणार आहे. 2 जुलैपर्यंत उमेदवारांना अर्ज मागे घेता येणार आहेत. त्यानंतर 18 जुलै रोजी मतदान होणार असून 21 जुलै रोजी मतमोजणी (Election Result) होणार आहे. या निवडणुकीसाठी विरोधकांसह सत्ताधारी भाजप मैदानात उतरली असून, मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे या पदासाठी आणखी एक नाव इच्छुक असल्याचं समजते. बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले हे राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवणार आहेत. (Abhijeet Bichukale to contest president election)

    दरम्यान, आपण राष्ट्रपती पदासाठी इच्छुक (Abhijeet Bichukale to contest president election) असून, काही आमदार-खासदारांशी संपर्कात (MLA And MP contact) आहोत, तसेच पाठिंब्यासाठी त्यांच्या गाठीभेटी घेत आहोत, असं बिचुकलेंनी सांगितले आहे. मी बहुजन समाजातला आहे, निर्व्यसनी, सुशिक्षित आणि कायद्याची जाण असणारा आहे. हे मी मागच्या वेळीच मोदींना सांगितलं होतं. मात्र बहुमत नसल्यामुळं कोविंदसाहेब (Kovind) राष्ट्रपती झाले असं बिचुकले (Abhijeet Bichukale) म्हणाले. मी सध्या पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातल्या (Bangal, UP and Maharashtra) काही आमदार- खासदारांशी सह्यांसंदर्भात संपर्कात आहे. तसेच त्यांच्या पाठिंब्यासाठी गाठी भेटी घेत असल्यांच बिचुकलेंनी सांगितलं.