accident
accident

पाबळ ता. शिरूर येथील एका दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने यामध्ये दुचाकीचालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

    शिक्रापूर : पाबळ ता. शिरूर येथील एका दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने यामध्ये दुचाकीचालकाचा मृत्यू झाल्याची (Accident in Shikrapur) घटना घडली. याप्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

    पाबळ ता. शिरूर येथील पाबळ लोणी रस्त्याने रोहिदास गोरडे हे त्यांच्या जवळील (एमएच १४ ई एक्स ९०५८) या दुचाकीवरून जात असताना पाठीमागून आलेल्या एका अज्ञात वाहनचालकाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यावेळी गोरडे यांना बेदम मार लागला. यावेळी येथील नागरिकांनी त्यांना रुग्णालयात नेले असता उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला,

    याबाबत खंडू धोंडीभाऊ गोरडे (वय ४५ वर्षे रा. गोसासी ता. शिरूर जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असून, शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात वाहनचालकावर गुन्हे दाखल केले आहेत. पुढील तपास पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव स्वामी व पोलीस हवालदार प्रशांत गायकवाड हे करत आहे.