accident
accident

हनुमंत कुंभार आपल्या दुचाकीवरून पत्नी व दोन मुलांसह कोल्हापूरला निघाले होते. पुलाची शिरोली येथे महामार्गाच्या मधोमध मोटरसायकल चालवत असताना महामार्गावरील पांढऱ्या पट्ट्यावरून दुचाकी अचानक घसरली. यामुळे हनुमंत यांचा दुचाकीवरील ताबा सुटला आणि चौघेही महामार्गावर पडले.

    शिरोली / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : दुचाकी घसरून झालेल्या अपघातात (Accident in Shiroli) महिला जागीच ठार झाली. तर पतीसह दोन मुले जखमी झाली. भाग्यश्री हनुमंत कुंभार (वय २९, रा. इटकरे, ता. वाळवा, जि. सांगली) असे मृत महिलेचे नाव आहे. पती हनुमंत विठ्ठल कुंभार (वय ३८), मुलगा स्वराज कुंभार (वय ६) व मुलगी शिवन्या (वय ३) अशी जखमींची नावे आहेत. पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर पुलाची शिरोली येथील महाडिक बंगल्याजवळ रविवारी दुपारी सव्वा एकच्या सुमारास ही दुर्घटना घडली.

    याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, हनुमंत कुंभार आपल्या दुचाकीवरून (एमएच १० एयू ५०४२) पत्नी व दोन मुलांसह कोल्हापूरला निघाले होते. पुलाची शिरोली येथे महामार्गाच्या मधोमध मोटरसायकल चालवत असताना महामार्गावरील पांढऱ्या पट्ट्यावरून दुचाकी अचानक घसरली. यामुळे हनुमंत यांचा दुचाकीवरील ताबा सुटला आणि चौघेही महामार्गावर पडले.

    भाग्यश्री यांना डोळ्याच्या वरील बाजूस डोक्यावर जोराचा मार लागल्याने त्या जागीच ठार झाल्या. हनुमंत, स्वराज व शिवन्या हे किरकोळ जखमी झाले. जखमींना उपचारासाठी कोल्हापूर येथील सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले. रात्री उशिरा याची नोंद घेण्याचे काम शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात सुरू होते.